ETV Bharat / state

भाजपच्या मंत्र्यांना जनतेची भिती वाटत नाही, पूरस्थितीवरून राज ठकारेंची महाजनांवर टीका

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा सांगलीतील पुरामध्ये सेल्फी काढत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यावरून आज मुंबईत आयोजित केलेल्या मनसे पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरे यांनी महाजनांवर टीका केली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे
author img

By

Published : Aug 9, 2019, 2:15 PM IST

Updated : Aug 9, 2019, 3:22 PM IST

मुंबई - सांगली, कोल्हापूरमधील पूरस्थिती पाहण्यासाठी मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमधून फिरतात. त्यांच्या सरकारमधील मंत्री पुरात जाऊन सेल्फी काढतात. या सरकारच्या मंत्र्यांना माज आला आहे. आता या मंत्र्यांना जनतेची भिती वाटत नाही, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर केली. आज शहरात मनसेचा पदाधिकारी मेळावा आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते.

भाजपच्या मंत्र्यांना जनतेची भिती वाटत नाही, पूरस्थितीवरून राज ठकारेंची महाजनांवर टीका

आता दहशतवादी ठरवण्याचा अधिकार फक्त अमित शाहंना -
युएपीए कायद्याची भारताला गरज नव्हती. मात्र, हा कायदा करण्यात आला. त्यामुळे एका व्यक्तीवर संशय आला तरी त्याला दहशतवादी ठरवले जाईल. कुणाला तुरुंगात पाठवायचे, कुणाला दहशतवादी ठरवायचे याचा अधिकारी फक्त अमित शाहंना असेल, असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.

४५ वर्षातील उच्चांकी बेरोजगारी भारतात -
आज देशाची परिस्थिती डबघाईला आली आहे. कारखाने बंद होत आहेत. जेट एअरवेज बंद पडले. त्यामुळे हजारो कर्मचारी बरोजगार झाले आहे. त्याचबरोबर बीएसएनएलचे कर्मचारी बेरोजगार झाले आहे. पुढील काळात १० लाख लोक बेरोजगार होतील. तसेच गेल्या ४५ वर्षातील उच्चांकी बेरोजगारी भारतात असल्याचे राज ठाकरे म्हणाले.

सरकार विदर्भ अन् मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणार -
भाजपला फारुख अब्दुला आणि मेहबुबा मुफ्ती यांच्यावर कारवाई होती, तर ती त्यांच्यापर्यंत मर्यादीत करायला पाहीजे होती. मात्र, काश्मिरची विभाजन केले. उद्या विदर्भ आणि मुंबईची अवस्था काश्मिरसारखी होईल. विदर्भ आणि मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे केले जाईल. कुठलाही विचार न करता महाराष्ट्राचे लचके तोडले जातील, अशी टीका राज यांनी यावेळी केली.

सरकार प्रत्येक राज्याची अस्मिता मिटवत आहे -
देशातील प्रत्येक राज्याला स्वतंत्र्य अस्मिता आहे. देशात वेगवेगळ्यात भाषा आहेत. त्यामुळे प्रांतरचना करण्यात आली. मात्र, आता भाजप सरकार नवनवीन कायदे करून प्रत्येक राज्याच्या अस्मितेचे महत्त्व कमी करीत आहे.

Last Updated : Aug 9, 2019, 3:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.