मुंबई - कोरोनाच्या संकटात अत्यावश्यक सेवेतील सरकारी, पालिका कर्मचाऱ्यांसोबतच एकही दिवस बंद न ठेवता, बँक कर्मचाऱ्यांनी आपली सेवा बजावली आहे. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांनासुद्धा इतर अत्यावश्यक सेवेतील सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच, सेवा-सुविधा द्याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.
बँक कर्मचारी वर्गाला बेस्टच्या बसमधून प्रवास करण्याची मुभा आहे. मात्र अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वर्गासाठी सुरू असलेल्या लोकलमधून प्रवास करण्यास रेल्वेकडून परवानगी देण्यात आली नाही. यावर मनसेनी नाराजी व्यक्त केली. बँक कर्मचारी कोरोना संकटात इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसारखेच काम करत आहेत. त्यांनाही सुविधी देण्यात यावी, अशी मागणी मनसेची आहे.
बँकेतील कर्मचारी सतत नागरिकांच्या संपर्कात येत असतो, तसेच नोटा हाताळतानाही त्यांना कोरोना संसर्ग होण्याची भीती आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसाठी लोकलने प्रवास करण्याची मुभा मिळावी, विमा कवच, व इतर सर्व सुविधा सरकारने द्याव्यात, अशी मनसेचे सरचिटणीस नितीन सरदेसाई यांनी केली आहे.
हेही वाचा - सोसायटी पदाधिकाऱ्यांना चाप; आता वृत्तपत्र, दूध विक्रेत्यांसह कामगारांना मज्जाव करता येणार नाही
हेही वाचा - सरासरी गुणांच्या आधारे 11वीच्या 60 विद्यार्थ्यांना रूपारेल महाविद्यालयाने केलं नापास, विद्यार्थ्यांत संताप