ETV Bharat / state

MNS Leader Sandeep Deshpande : कोरोना काळातील भ्रष्टाचार पुराव्यासहित जाहीर करणार - संदीप देशपांडे

author img

By

Published : Jan 21, 2023, 10:00 AM IST

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका दोन महिन्यांनी होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मनसेने मुंबईत 'घे भरारी सभा' सुरू केलेली आहे. यावेळी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी कोरोना काळातील भ्रष्टाचार पुराव्यासहित जाहीर करणार असल्याचे सांगितले.

Sandeep Deshpande
संदीप देशपांडे

मुंबई : कोरोना काळामध्ये अनेक प्रकारच्या नियमबाह्य गोष्टी मुंबई महानगरपालिकेमध्ये घडल्या. या भ्रष्टाचारामुळेच मुंबई महानगरपालिका पोखरली गेली. म्हणून कोरोना काळामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराला उघड करणार असल्याचे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. मुंबई महानगरपालिका दोन महिन्याच्या अंतराने येऊन ठेपल्या आहे. त्या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे मुंबईतील मनसेचे नेते यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

घोटाळे आता बाहेर : संदीप देशपांडे यांनी ट्विटमध्ये म्हटलेले आहे की, चंदन तस्कर डाकू वीरप्पन याने जंगलातील लाकडू लाकडाच्या तस्करीमुळे जसे तिथल्या नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट केली. जमिनीची लूट करत असताना जनतेची देखील लूट केली. त्याचप्रकारे मुंबई महानगरपालिकेला तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी लुटलेले आहे. जनतेच्या जीवाची परवा न करता जनतेने भरलेला कर महानगरपालिकेने असा उधळ हस्ते उधळला. त्यामुळेच या टोळीचे एक एक घोटाळे आता बाहेर काढण्याचे काम महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे करणार असल्याचे संदीप देशपांडे यांनी म्हटले.

कोरोना काळात भ्रष्टाचार : संदीप देशपांडे यासंदर्भात म्हणतात, की आपण भ्रष्टाचाराच्या अनेक कथा ऐकतो, विविध प्रकार पाहतो. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी कोरोनाच्या काळामध्ये अशा प्रकारच्या भ्रष्टाचार केलेला आहे. की तो भ्रष्टाचार तुम्हाला ऐकून पाहून नवल वाटेल. याचे कारण चेकने जो व्यवहार केला जातो. धनादेश जो अधिकृत बँकेमध्ये वटवला जातो. त्या माध्यमातून देखील भ्रष्टाचार केलेला आहे. हा काळा व्यवहार आम्ही उघडकीस आणू आणि त्यासाठी आम्ही सज्ज आहोत. त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत आणि हे पुरावे आम्ही पुढील दोन दिवसात माध्यम आणि जनतेसमोर मांडू असे देखील त्यांनी नमूद केले.

भ्रष्टाचार उघडकीस : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवडणूक जवळ आलेली आहे. त्यामुळे मुंबईमध्ये 'घे भरारी सभा' विविध विधानसभा मतदार संघ निहाय सुरू केलेल्या आहे. यामध्ये देखील मुंबई महानगरपालिकेच्या सर्व कारभारावर त्यांनी कोरडे उडलेले आहे. विविध भ्रष्टाचार बाहेर काढण्याचे त्यामध्ये जाहीर देखील केले होते. त्यामुळे आता ही मालिका येथून सुरू होणार आहे. येत्या सोमवारी संदीप देशपांडे मुंबई महानगरपालिकेमधील झालेला भ्रष्टाचार पुराव्यासहित जाहीर करणार आहेत.

भ्रष्टाचार पुराव्यासहित जाहीर करणार : मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत असणारे दीड कोटी लोक विविध प्रकारे कर भरतात. कराच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेच्या सर्व गाडा चालतो आणि ज्यांच्या हाती सत्ता होती, त्यांनी जनतेला अंधारात ठेवून अनेक प्रकारचे करार मतदार केले. जनतेचा हा पैसा आम्ही वाया जाऊ देणार नाही, म्हणूनच येत्या सोमवारी याबाबत पुराव्याशी ही बाब जाहीर करू ; असे संदेश देशपांडे यांनी ईटीव्ही भारतसोबत बातचीत करताना म्हटले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका दोन महिन्याच्या अंतरावर येऊन ठेपलेल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झालेली पाहायला मिळते. येत्या काळात शिवसेना आणि महाराष्ट्र नोंदणी निर्माण सेना यांच्यात शाब्दिक युद्ध रंगल्यास नवल ते कसले ? याच रीतीने आता घे भरारी सभेमधून मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर टीका करत असताना शिवसेनेवर मनसेकडून हल्लाबोल केला गेला आहे. तो अधिक तीव्र होणार आहे.

हेही वाचा : MNS leader Sandeep Deshpande मनसे नेते संदीप देशपांडे पत्रकारांच्या प्रश्नावर भडकले, उडाली शाब्दिक चकमक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.