ETV Bharat / state

'xxx' दम असेल तर आरोप सिद्ध करा अन्यथा राजकारण सोडा, संदीप देशपांडेंचे तावडेंना आव्हान

तावडेंच्या 'xxx' दम असेल, तर त्यांनी आम्ही केलेले आरोप खोटे असल्याचे सिद्ध करावे अन्यथा राजकारण सोडावे, अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडेंनी तावडेंवर केली.

संदीप देशपांडे
author img

By

Published : Apr 7, 2019, 4:57 PM IST

Updated : Apr 7, 2019, 6:03 PM IST

मुंबई - मोदी सरकारच्या डिजिटल इंडिया योजनेची शनिवारी राज ठाकरेंनी पोलखोल केली. यानंतर विनोद तावडेंनी ठाकरे यांच्या पक्षावर गंभीर टीका केली. तावडेंच्या टीकेला उत्तर देताना, तावडेंच्या xxx दम असेल, तर त्यांनी आम्ही केलेले आरोप खोटे असल्याचे सिद्ध करावे अन्यथा राजकारण सोडावे, असे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.

संदीप देशपांडे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी गुढीपाडवा मेळाव्यात केलेले भाषण हे भाजप नेत्यांच्या जिव्हारी लागले आहे. त्यातूनच तावडेंनी ठाकरे यांच्या पक्षावर गंभीर टीका केली. ठाकरे यांनी शनिवारच्या भाषणात मोदींच्या डिजिटल इंडियाची पोलखोल केली होती. यामुळे संतप्त झालेले तावडे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, एवढा अभ्यास पक्षासाठी केला असता तर फायदा झाला असता. आधी कष्ट घेतले असते तर दुसऱ्याला मदत करायची वेळ आली नसती.

तावडेंच्या या प्रतिक्रियेला प्रत्युत्तर देताना देशपांडे म्हणाले, माझे तावडे यांनाच नाही, तर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आव्हान आहे. त्यांनी ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी, नाही तर फालतू बडबड बंद करावी. आम्ही हरिसाल येथील जी पोलखोल केली त्याबाबत तावडे जे म्हणाले आहेत. त्यांना माझे खुले आव्हान आहे. त्यांनी आमच्यासोबत यावे आणि खरे खोटे करावे. आम्ही सादर केलेली एक गोष्टदेखील खोटी निघाली तर आम्ही राजकारण सोडू नाहीतर त्यांनी राजकारण सोडावे. राज यांच्या वाक्यांची मोडतोड करून चुकीचा अर्थ काढला जात आहेत. ती भाजपची जुनी सवय आहे. खोट बोला पण रेटून बोला, असेही ते यावेळी म्हणाले.

Intro:
मुंबई ।
पार्श्वभागात दम असेल तर आरोप सिद्ध करा नाहीतर राजकारण सोडा असे आव्हान राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिले आहे.
डीजीटल इंडियाबाबत आम्ही काल काही पुरावे सादर केले. यावर विनोद तावडे यांनी टीका केली आहे. सर्वप्रथम तावडे यांनी फालतू बडबड बंद करावी. राज ठाकरेंवर केलेले आरोप सिद्ध करावेत, अन्यथा राजकारण सोडावे असेही संदीप देशपांडे म्हणाले आहेत.
Body:मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी गुढीपाडवा मेळाव्यात केलेलं भाषण हे भाजप नेत्यांच्या जिव्हारी लागले आहे. त्यातूनच विनोद तावडे यांनी राज ठाकरे यांच्या पक्षावर गंभीर टीका केली. राज ठाकरे यांनी कालच्या भाषणात मोदींच्या डिजिटल इंडियाची पोलखोल केली होती. यामुळे संतप्त झालेले तावडे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, एवढा अभ्यास पक्षासाठी केला असता तर फायदा झाला असता. आधी कष्ट घेतले असते तर दुसऱ्याला मदत करायची वेळ आली नसती. संदीप देशपांडेला पाठवायचा चेक करायचं, यातून लोकांना कळत की हे जे आहे ते स्क्रिप्टप्रमाणे आहे. देश खड्ड्यात घालायला राहुल गांधींना द्या म्हणाले, तो काय मनसे पक्ष आहे का? अशी उपरोधिक टीकाही तावडे यांनी केली आहे.

या प्रतिक्रियेला प्रतिउत्तर देताना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले, की माझा विनोद तावडे यांनाच नाही तर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आव्हान आहे. त्यांनी राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी नाहीतर फालतू बडबड बंद करावी. हरिताल येथील आम्ही जी पोलखोल केली त्याबाबत तावडे जे म्हणाले आहेत. त्यांना माझे खुले आव्हान आहे. त्यांनी आमच्यासोबत यावे आणि खरे खोटे करावे. आम्ही सादर केलेली एक गोष्ट देखील खोटी निघाली तर आम्ही राजकारण सोडू नाहीतर त्यांनी राजकारण सोडावे. राज यांच्या वाक्यांची मोडतोड करून चुकीचा अर्थ काढला जात आहेत. ती भाजपची जुनी सवय आहे. खोट बोला पण रेटून बोला.
शरद पवार आणि आम्ही ते आमचा पक्ष पाहून घेईल. त्यात तावडे यांनी लक्ष घालण्याची गरज नाही.
Conclusion:
Last Updated : Apr 7, 2019, 6:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.