ETV Bharat / state

मनसे नेते अमित ठाकरेंनी घेतली आरोग्यमंत्र्यांची भेट; केल्या 'या' मागण्या

सद्यस्थितीत कोरोना रुग्ण आणि इतर रुग्णांना रुग्णवाहिका मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे प्रत्येक रुग्णाला कोणत्याही परिस्थितीत रुग्णवाहिका उपलब्ध करुन द्यायलाच हवी, अशी सूचनाही त्यांनी केली. प्रत्येक रुग्णालयात पोलीस कर्मचाऱ्यांसाठी काही बेड्स आरक्षित ठेवावेत आणि त्यांचा संपूर्ण वैद्यकीय खर्च शासनानेच करावा, आदी प्रमुख मुद्द्यांवर अमित ठाकरे यांनी आरोग्यमंत्री टोपे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली.

मनसे नेते अमित ठाकरेंनी घेतली भेट
मनसे नेते अमित ठाकरेंनी घेतली भेट
author img

By

Published : May 22, 2020, 8:37 PM IST

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी शुक्रवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मुंबईतील आरोग्यसेवा आणि डॉक्टर, कर्मचारी पगार कपात रद्द करावी, आदी मागण्या केल्या. टोपेंच्या शासकीय निवासस्थानी ही भेट झाली.

सद्यस्थितीत कोरोना रुग्ण आणि इतर रुग्णांना रुग्णवाहिका मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे प्रत्येक रुग्णाला कोणत्याही परिस्थितीत रुग्णवाहिका उपलब्ध करुन द्यायलाच हवी, अशी सूचनाही त्यांनी केली. प्रत्येक रुग्णालयात पोलीस कर्मचाऱ्यांसाठी काही बेड्स आरक्षित ठेवावेत आणि त्यांचा संपूर्ण वैद्यकीय खर्च शासनानेच करावा, आदी प्रमुख मुद्द्यांवर अमित ठाकरे यांनी आरोग्यमंत्री टोपे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली.

हेही वाचा - कामगार नेते दादा सामंत यांचे निधन

कोरोना आणि अन्य आजारांच्या उपचारासाठी जी रुग्णालये कार्यरत आहेत, त्यांच्या बेड्सची क्षमता स्पष्टपणे नागरिकांना कळावी, यासाठी एक अ‌ॅप विकसित करावे, बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी आणि बंधपत्रित अधिपरिचारिका यांच्या पगारातील कपात रद्द करुन त्यांचा पगार पूर्ववत करावा, अशा मागण्याही अमित ठाकरेंनी केल्या. तर आरोग्यमंत्र्यांनी या चारही विषयांबाबत अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर हे विषय मार्गी लावण्याचं आश्वासन दिले. त्याबद्दल अमित ठाकरे यांनी आरोग्यमंत्र्यांचे मन: पूर्वक आभार मानले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.