ETV Bharat / state

वाचाळवीरांनो.. तर 'तुम्ही' सगळेच भस्मसात व्हाल, मनसेचा एमआयएमला इशारा - महाराष्ट्रात वेड वाकडं केल्यास राज ठाकरेंशी गाठ

एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पठाण यांच्या विधानानंतर मनसेने त्यांच्या अधिकृत पेजवरुन ट्टीट करत एमआयएमला इशारा दिला आहे.

MNS comment on Varis pathan statement
मनसेचा एमआयएमला इशारा
author img

By

Published : Feb 20, 2020, 7:55 PM IST

Updated : Feb 20, 2020, 8:03 PM IST

मुंबई - सीएए आणि एनआरसी विरोधात गुलबर्गा येथे आयोजित सभेत एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी वादग्रस्त विधान केले. त्यांच्या या विधानामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. पठाण यांनी केलेल्या वक्तव्यावर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी टीका केली आहे. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही त्यांच्या विरोधात आक्रमक झाली आहे.

  • 'आम्ही...' 'तुम्ही...' असले भेद आम्हाला मान्य नाहीत. पण.... 'आम्ही' इतके, 'तुम्ही' तितके... अशी भाषा करणाऱ्या वाचाळवीरांना 'आम्ही' इतकंच सांगतो की जर शिवरायांचा तिसरा नेत्र उघडला तर 'तुम्ही' सगळेच भस्मसात व्हाल!#मनसेदणका 👊 https://t.co/nuaQ2BuI9H

    — MNS Adhikrut (@mnsadhikrut) February 20, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
मनसेचा एमआयएमला इशारा

महाराष्ट्रात वेड वाकडं केल्यास राज ठाकरेंशी गाठ आहे-

आम्ही 15 कोटी असलो तरी 100 कोटींना भारी आहोत. आतापर्यंत महिला बाहेर आल्यात तर तुम्हाला घाम फुटला आहे. आम्ही आलो तर काय होईल समजून घ्या, असे चिथावणीखोर वक्तव्य वारीस पठाण यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर मनसेने आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन पठाण यांना एक प्रकारे इशारा दिला आहे. तसेच राज ठाकरेंचा जुन्या भाषणाचा एक व्हिडिओसुद्धा मनसेने शेअर केला आहे. 'आम्ही तुम्ही असले भेद आम्हाला मान्य नाहीत. पण आम्ही इतके, 'तुम्ही' तितके अशी भाषा करणाऱ्या वाचाळवीरांना 'आम्ही' इतकंच सांगतो की, शिवरायांचा तिसरा नेत्र उघडला तर 'तुम्ही'(१५ कोटी) सगळेच भस्मसात व्हाल, असा इशारा दिला आहे. तसेच राज यांच्या एका भाषणामध्ये एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांवर केलेल्या वक्तव्याचा म्हणजेच.. महाराष्ट्रात वेड वाकडं केल्यास राज ठाकरेशी गाठ आहे. अशा आशयाचा मनसेध्यक्षांचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Last Updated : Feb 20, 2020, 8:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.