मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि शिंदे गट यांच्यातील आरोप प्रत्यारोप वाढत चालले (Sanjay Raut criticize Shinde Group )आहेत. संजय गायकवाडांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देत राऊत यांनी आव्हान दिले आहे. “मला कोणी ‘गद्दार’ म्हटल्यावर शिव्या देत असेल, तर तो मी माझा सन्मान समजतो. कारण ते ‘गद्दार’ आहेत. त्यांना उत्तम शिव्या देता येत असतील. त्यांनी शिव्या सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या भाजपाचे राज्यपाल, प्रवक्ते मंत्री यांना ( Who Insult Shivaji maharaj should be scolded ) द्यावात. आम्ही त्या शिव्या देणाऱ्यांवरती फुले उधळू. छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुलेंचा अपमान करणाऱ्यांना शिव्या द्या, महाराष्ट्र तुमचं कौतुक करेल,” असे आव्हान संजय राऊत यांनी शिंदे गटातील आमदारांना दिले आहे. संजय राऊत नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
कपाळावर गद्दार कोरले : चित्रपटांमध्ये जसे अमिताभ बच्चन यांच्या हातावर ‘मेरा बाप चोर है’ असे कोरले ( Film Dialogue Use To Criticize ) होते. तसेच शिंदे गटाच्या आमदारांच्या कपाळावर ‘गद्दार’ असे कोरले आहे. याचा त्रास त्यांना पुढील अनेक पिढ्यांपर्यंत होईल, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटातील आमदारांना लक्ष्य केले होते. त्याला प्रत्यूत्तर देताना शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली होती.
संजय गायकवाड यांची प्रतिक्रीया : “आमच्यावर गद्दारी केल्याचा आरोप नव्हे तर आम्ही उठाव-क्रांती केल्याचा अभिमान आमच्या पुढच्या पिढ्यांना वाटणार आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी यापूढे अशी भाषा वापरू नका. राहिला प्रश्न आम्ही लढायचे की पडायचे, तर आमचा निर्णय जनतेला मान्य आहे. तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेली हातमिळवणी जनतेला मान्य नाही. शिवसेना-भाजपा म्हणून लोकांनी तुम्हाला निवडून दिले होते. अमिताभ बच्चनचा डायलॉग चित्रपटासाठी ठीक आहे. पण महाराष्ट्रात आमच्या किती जागा निवडून येतात आणि तुमच्या किती जागा निवडून येतात ते आपण बघू…”, असे गायकवाड म्हणाले होते.