ETV Bharat / state

CM Eknath Shinde : बंडखोर आमदारांची वाढती नाराजी; मुख्यमंत्री शिंदे यांचे वाढले टेन्शन?

शिंदे गटात आमदार नाराज (MLA unhappy in Shinde group) असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांचे टेन्शन वाढवले (tension of CM Eknath Shinde increased) आहे. बंडखोर आमदारांची वाढती नाराजी मुख्यमंत्र्यांसाठी चिंतेचा विषय (tension of CM Eknath Shinde) ठरल्याची चर्चा राजकीय वर्तूळात व्यक्त होत आहे.

author img

By

Published : Nov 13, 2022, 8:17 PM IST

CM Ekanth Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : पक्षातील नाराजी उफाळून आल्याने शिवसेनेत दोन गट तयार झाले. मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील नाराजीतूनच पक्षाविरोधात बंड पुकारला. आता याच नाराजीचा सामना मुख्यमंत्री शिंदे यांना करावा लागत आहे. शिंदे गटात आमदार नाराज (MLA unhappy in Shinde group) असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांचे टेन्शन वाढवले (tension of CM Eknath Shinde increased) आहे.

मुख्यमंत्री शिंदेंसाठी डोकेदुखी : आमदार बच्चू कडू, आमदार संजय शिरसाट यांच्यापाठोपाठ चिमणअप्पा पाटील आणि गुलाबराव पाटील यांच्यातील वाद उफाळून आला होता. आता आमदार सुहास कांदे यांची नाराजी समोर आली आहे. जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांवरून कांदे आणि दादा भुसे यांच्यात एकमत झाले नसल्याने कांदे कमालिचे नाराज आहेत. पालकमंत्र्यांच्या बैठकीत आमदारांना बोलावले जात नाही. इतरांना विश्वासात न घेता जिल्ह्यात पदाधिकारी नेमले आहेत. नियुक्त पदाधिकारी पक्ष विस्तारासाठी अकार्यक्षम आहेत, अशा तक्रारी कांदे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मांडल्या. कांदे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. आमदारांची नाराजी ही मुख्यमंत्री शिंदे यांच्यासाठी डोकेदुखी ठरत असल्याचे बोलले जात (Shinde group MLA) आहे.

आमदार सरनाईकांचीही नाराजी ? मुख्यमंत्री शिंदे यांचे समर्थक आमदार प्रताप सरनाईक हे नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या. प्रताप सरनाईक यांनी आपला मतदारसंघ भाजपच्या एका माजी आमदारासाठी सोडावा, असा आग्रह मुख्यमंत्री करीत असल्याने सरनाईक नाराज असल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या. मात्र या बातम्यांचे त्यांच्याकडून खंडन करण्यात आले होते.

बंडखोर आमदारांची वाढती नाराजी : आमदार रवी राणा यांनी आमदार कडू यांच्यावर गुवाहाटीला जावून कोट्यावधी रुपये घेतल्याचा आरोप केला होता. त्या आरोपाने कडू संतापले होते. पुरावे द्या, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी भुमिका घ्यावी अन्यथा, सात – आठ आमदार माझ्या सोबत आहेत, धमाका करू असा आक्रमक पवित्रा यांनी घेतला. मंत्रीमंडळ विस्तारात समावेश न झाल्याने शिरसाट यांनीही थेट नाराजी व्यक्त केली हाेती. बंडखोर आमदारांची वाढती नाराजी मुख्यमंत्र्यांसाठी चिंतेचा विषय (tension of CM Eknath Shinde) ठरल्याची चर्चा राजकीय वर्तूळात व्यक्त होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.