ETV Bharat / state

MLA Sanjay Gaikwad : संजय राऊत म्हणजे मोकाट बोकड, संजय गायकवाड यांची सडकून टीका - संजय राऊत म्हणजे मोकाट बोकड

शिवसेना नेते संजय राऊत (Shiv Sena Leader Sanjay Raut) आणि शिंदे गटाचे डॅशिंग आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad Highly Criticized) यांच्यात, रेडे आणि बोकड शब्दावरुन वाद पेटला.

MLA Sanjay Gaikwad
संजय गायकवाड
author img

By

Published : Nov 23, 2022, 4:19 PM IST

मुंबई : शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत (Shiv Sena Leader Sanjay Raut) यांनी शिंदे गटाच्या आमदारांचा समाचार घेतला होता. दोन्ही गटाकडून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. गुहाटीतील कामख्या देवीला रेडे पाठवल्याचे संजय राऊत यांचे विधान चांगलेच व्हायरल झाले होते. पुढे राऊत यांच्याकडून सतत रेडे असा उल्लेख होत असल्याने, शिंदे गटाचे डॅशिंग आमदार संजय गायकवाड यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर सडकून टीका (MLA Sanjay Gaikwad Highly Criticized) केली. 'राऊत हे सोडलेला बोकड' असल्याचे विधान गायकवाड यांनी केले. त्यांच्या विधानामुळे हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया देतांना आमदार संजय गायकवाड

राऊतांचा उल्लेख बोकड : संजय गायकवाड म्हणाले की, राऊत वेळोवेळी 50 रेडे असा उल्लेख वारंवार करतात. संत ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलून घेतले होते. बाळासाहेबांच्या जाज्वल्य हिंदुत्वाचे पुरस्कार आणि धर्माला मानणारे लोक आहोत. राऊत यांनी जी भाषा वापरली आहे; त्याच्या मध्ये उल्लेख केला की, कामख्या देवीला रेडे पाठवले. जर आम्ही रेडे असू, तर राऊत मोकाट असलेला बोकड आहेत. जो देवाच्या नावाने सोडलेला असतो, त्याला कोणी कापत नाही किंवा कोणी चांगल वागवत नाही. त्याच्या अंगाचा घाण वास येत राहतो, असा बोकड आई कामख्या देवी सुद्धा स्वीकारणार नाही, असे गायकवाड म्हणाले.

26 आणि 27 नोव्हेंबरला कामख्या देवीचा दौरा : राज्यात राजकीय नाट्यमय घडामोडीनंतर शिंदे सरकार सत्तेवर आले. एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थापन झाल्यास कामख्या देवीला येऊ, असे गाऱ्हाणे त्यांनी घातले होते. सध्या राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणुन स्थानापन्न झाले आहेत. त्यामुळे देवी कामाख्या देवीचे आभार मानायला आम्ही जाणार आहोत. येत्या 26 आणि 27 नोव्हेंबरला हा दौरा निश्चित केल्याचे संजय गायकवाड यांनी सांगितले.

संजय राऊत तुरुंगाबाहेर येताच, परत एकदा महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात टिका शस्त्र सोडणे परत सुरु झाले आहे. आणि आता परत एकदा राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.