ETV Bharat / state

आधी बिहारची गुन्हेगारी कमी करण्याकडे लक्ष द्या...; रोहित पवारांनी चिराग पासवान यांना सुनावले

author img

By

Published : Sep 14, 2020, 11:41 AM IST

आमदार रोहित पवार यांनी लोकजनशक्तीचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्यावर निशाणा साधला आहे. चिराग पासवान यांनी आधी बिहारमधील कायदा व सुव्यवस्था सुधारण्याबाबत विचार करावा. बिहारची राजधानी ही खून, हुंडाबळी यामध्ये आघाडीवर आहे. त्याकडे लक्ष द्या, फक्त राजकीय लाभापोटी महाराष्ट्रावर चिखलफेक करू नका. महाराष्ट्र हे कधीही सहन करणार नसल्याचे रोहित पवार यांनी चिराग पासवान यांना सुनावले आहे.

रोहित पवारांनी चिराग पासवान यांना सुनावले

मुंबई - राष्ट्रवादी पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी बिहारच्या लोकजनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांना सडेतोड उत्तर दिले आहे. चिराग पासवान यांनी आधी बिहारमधील कायदा व सुव्यवस्था सुधारण्याबाबत विचार करावा. बिहारची राजधानी ही खून, हुंडाबळी यामध्ये आघाडीवर आहे, त्याकडे लक्ष द्या. फक्त राजकीय लाभापोटी महाराष्ट्रावर चिखलफेक करू नका, महाराष्ट्र हे कधीही सहन करणार नसल्याचे रोहित पवार यांनी चिराग पासवान यांना सुनावले आहे.

कंगना रणौत, सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणावरून बिहारच्या राजकीय नेते मंडळीकडून महाराष्ट्राची बदनामी आणि टीका करण्याचे काम सुरू आहे. कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर कारवाई केल्यानंतर चिराग पासवान यांनी महाराष्ट्रातील कायदा व सुवस्था बिघडली असून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करायला हवी, असे मत व्यक्त केले होते. त्यावर आमदार रोहित पवार यांनी चिराग पासवान यांना एक खरमरीत पत्र लिहून बिहारमधील गुन्हेगारीचा लेखाजोखाच मांडला आहे.

आमदार रोहित पवार यांनी चिराग पासवानला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, चिराग पासवान आपण महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त करीत आहात. त्यासाठी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केल्याचे ऐकण्यात आले आहे. मात्र, तुम्ही कायदा-सुव्यस्थेचे इतकेच पुरस्कर्ते आहात, तर ज्यावेळी २०१८मध्ये मुजफ्फरपूर येथील निवारागृहात मुलींचे लैंगिक शोषण करण्यात आले होते, त्यावेळी तुम्ही बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी का केली नाही? त्यावेळी तुम्हीच म्हणाला होतात की, अशा घटना इतर जिल्ह्यांतही घटल्याचे समोर येत आहेत, असे सांगत, त्यांनी नितीश कुमार यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी केली नसल्याबद्दल रोहित पवार यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

एवढेच नाही तर, नुकत्याच जाहीर झालेल्या एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार बिहारची राजधानी पाटणा ही खूनांच्या घटनांमध्ये देशातील १९ शहरांमध्ये पहिल्या क्रमाकांवर आहे. पाटण्यातील खूनांच्या घटनांची सरासरी ४.४ टक्के इतकी आहे. ही आकडेवारी गुन्हेगारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जयपूरपेक्षा (३.१ टक्के) खूप जास्त आहे. हुंड्यासाठी मुलींच्या हत्यांमध्येही पाटणाचा पहिला क्रमांक लागतो.

बिहारमध्ये २०१८मध्ये राजेंद्र सिंह यांच्यासारख्या पाच ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्त्यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. तसेच अनेक पत्रकारांचे खून करण्यात आले. भूखंड माफियाकडून लोकांना मारहाण, घरे जाळणे यासारख्या घटना बिहारमध्ये राजरोस घडतात. त्यामुळे तेथील सर्वसामान्य माणसांची काय अवस्था असेल, हे यावरून दिसून येतेच. गेल्या १५ वर्षांत सहापेक्षा जास्त अधिकाऱ्यांची गुन्हेगारांनी हत्या केली आहे. तरीही, आपला पक्ष सत्ताधारी पक्षासोबत कसा काय सत्तेत आहे, याचेच आश्चर्य वाटत, असल्याचा टोलाही रोहित पवार यांनी चिराग पासवान यांना लगावला आहे.

सुशांत सिंगच्या मृत्यूचा वापर आपल्या राजकीय करिअरसाठी करणाऱ्या अभिनेत्रीच्या सुरात सूर मिसळून महाराष्ट्र राज्याविरोधात टीका करणे सोपे आहे. पण, बिहारमधील जर्जर झालेल्या प्रत्येक मूलभूत सुविधेची जबाबदारी घेऊन त्यात सुधारणा करणे अवघड असल्याचे सांगत पासवान यांच्या कार्यक्षमतेवर रोहित यांनी निशाणा साधला. तसेच दुःख याचेच वाटते आहे की, आपण आपल्या राजकीय वाटचालीसाठी सोपा रस्ता निवडत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

चिराग पासवान यांनी चित्रपटसृष्टीत काम केले आहे. त्याची आठवण करून देत पवार म्हणाले की, सिनेसृष्टीतील करिअरच्या काळात आपणही मुंबईचं आपलेपण अनुभवले असेल. मात्र, केवळ राजकीय फायद्यासाठी आपण महाराष्ट्रावर चिखलफेक करत आहात. हे महाराष्ट्रातील जनता कधीही सहन करणार नाही, अशा सडेतोड शब्दांत रोहित पवार यांनी पासवान यांच्या राष्ट्रपाती राजवटीच्या मागणीचा समाचार घेतला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.