मुंबई MlA Rais Shaikh : मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये 'प्रभू श्रीराम' या विषायावर घेण्यात येणारी स्पर्धा थांबवावी, यासदंर्भात आमदार शेख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना सोमवारी पत्र पाठवले आहे. महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर चालवलेले धार्मिक ध्रुवीकरण असून हे रोखण्यात यावे, अशी मागणी रईस यांनी केलीय. दरम्यान, यासंदर्भात बोलण्यास पाकमंत्री मंगलप्रभाकत लोढा यांनी नकार दिला आहे.
धार्मिक स्पर्धा घेणे बेकायदा : यासंदर्भात शेख म्हणाले की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये 'मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीराम जीवन चरित्र’ या विषयांवर ९ ते १९ जानेवारी दरम्यान निबंध, चित्रकला, कवितालेखन आणि नाट्यस्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. महानगरपालिकेच्या शालेय शिक्षण विभागाने ५ जानेवारी रोजी त्यासंदर्भात परिपत्रक काढले होते. अशा स्पर्धा आयोजित करण्याबाबत मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पालिका प्रशासनाला निर्देश दिले होते. पालकमंत्री लोढा यांनी अशा स्पर्धा घेण्याचे दिलेले निर्देश सर्वस्वी बेकायदेशीर आहे. धार्मिक स्पर्धाद्वारे बृहन्मुंबई महानगरपालिका शाळांचे भगवीकरण करण्यास आमचा ठाम विरोध असल्याचं त्यांनी सांगितलं.
शाळांचे चालवलेले भगवीकरण रोखावे : पालकमंत्री लोढा यांनी १५ डिसेंबर २०२३ रोजीच्या पत्रान्वये पालिका प्रशासनाला स्पर्धा घेण्याबाबत दिलेल्या आदेशाला आम्ही कडाडून विरोध केला होता. तसे पत्र १७ डिसेंबर २०२३ रोजी मुख्यमंत्री शिंदे यांना पाठवून हस्तक्षेप करण्याची मागणीही केली होती. लोढा यांनी महानगरपालिका शाळांचे चालवलेले भगवीकरण रोखावे, अशी पुन्हा मागणी मुख्यमंत्री शिंदेंकडे करत असल्याचं रईस शेख यांनी सांगितलं.
धार्मिक स्पर्धांमुळं संविधानाला तिलांजली : धार्मिक हेतूने शाळांमध्ये स्पर्धा भरवून भारतीय संविधानामधील धर्मनिरपेक्ष मूल्यास तिलांजली देण्याचा पालकमंत्री लोढा यांचा प्रयत्न रोखणं अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा, याप्रकरणी आम्हाला न्यायालयात दाद मागण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या पत्रामध्ये दिला आहे.
हेही वाचा -