मुंबई : पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही ३५४. मी ह्या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार आहे. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा (MLA Jitendra Avhad to resign) देण्याचा निर्णय घेतो आहे. लोकशाहीची हत्या आहे, उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत नाही असे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट (Avhad to resign from MLA due to police case) केले आहे.
नक्की काय आहे प्रकरण : हर हर महादेव चित्रपट पाहायला गेलेल्या प्रेक्षकांना मारहाण केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी अटक केली होती. या अटकेनंतर ठाणे जिल्हा न्यायालयाकडून जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर झाला होता. मात्र जामीन मिळाल्यानंतर ही माजी मंत्री जितेंद्र आव्हाड ( Former Minister Jitendra Awhad ) यांनी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत दाखवलेला इतिहास चुकीचा असल्याचे सांगितले (Jitendra Avhad to resign from MLA) होते.
विकृतकरणाच्या विरोधात शेवटपर्यंत लढा देणार - जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास चुकीचा दाखवणाऱ्यांच्या विरोधात आपण लढत राहू असा इशारा दिला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबत सध्या काही लोक विकृतीकरण करत आहे. या विकृतीकरणाच्या विरोधात आपण रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत नेहमीच उभे राहू, असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले (MLA Jitendra Avhad police case) होते.
आव्हाडांना अटक व जामीन - हर हर महादेव चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत चुकीचा इतिहास दाखवला गेला आहे. गेल्या काही वर्षात जाणून-बुजून काही लोक चुकीचा इतिहास समोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांच्याकडून करण्यात आलेला आहे. ठाण्याच्या एका मॉलमध्ये चित्रपट पाहायला गेलेल्या प्रेक्षकारांना झालेल्या मारहाणी नंतर जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.