ETV Bharat / state

MLA Disqualification Hearing : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी उद्या - राहुल नार्वेकर - आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी

MLA Disqualification Hearing: शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी 13 ऑक्टोबर रोजी पार पडणार होती. (Shiv Sena MLA Disqualification) मात्र विधानसभा (Assembly Speaker) अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी सुनावणी एक दिवस अगोदर घेणार असल्याचं म्हटलं आहे. नार्वेकर सुनावणी संदर्भात दिरंगाई करत असल्याचा आरोप वारंवार विरोधकांकडून होत आहे. त्यामुळे एक दिवस आधी होणाऱ्या सुनावणीवर विरोधक काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंं आहे.

MLA Disqualification Hearing
राहुल नार्वेकर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 11, 2023, 4:08 PM IST

मुंबई MLA Disqualification Hearing : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर विरोधकांकडून सुनावणीला विलंब लावत असल्याची वारंवार टीका होत आहे. मात्र सुनावणीच्या तारखेच्या एक दिवस आधी ते सुनावणी घेत आहेत. याबाबत राहुल नार्वेकर यांनी माहिती दिली. जी 20 मधील पीठासीन अधिकाऱ्यांची P20 कॉन्फरन्स दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं उद्घाटन केलं जाणार आहे. 13 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमाचं मला आमंत्रण आलं असून कार्यक्रमाला उपस्थित राहणं आवश्यक आहे. त्यामुळे 13 ऑक्टोबरला होणारी आमदार अपात्रतेची सुनावणी 12 ऑक्टोबरला घेत असल्याची माहिती राहुल नार्वेकर यांनी दिली आहे.

निर्णयावर दबाव पडू देणार नाही : सुनावणीत कुठल्याही प्रकारची दिरंगाई करायची नाही आणि लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आहे. तारीख पुढे नेऊ शकलो असतो; परंतु मला कोणत्याही प्रकारे वेळ घालवायचा नाही. म्हणूनच एक दिवस आधी सुनावणी घेऊन या विषयात मी पुढे जाणार असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले. एक दिवस आधी सुनावणी घेत असल्यामुळे दिरंगाई करतोय की लवकर सुनावणी करतोय याबाबत प्रत्येकजण माहिती प्राप्त करू शकतो. विरोधकांचा टीका करण्यामागचा हेतू काय आहे हे मला माहिती आहे. टीका टिपणीच्या प्रयत्नातून माझ्या निर्णय प्रक्रियेवर कोणताही फरक पडणार नाही. माझ्यावर टीका करणाऱ्यांना निर्णय प्रक्रियेवर प्रभाव टाकायचा असेल. मात्र, माझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव पडणार नाही आणि पडू देखील देणार नाही मी नियमानुसार आणि घटनेच्या तरतुदीनुसार निर्णय घेणार असल्याचं नार्वेकर यांनी स्पष्ट केलं आहे.

सुशोभीकरण कामाची पाहणी : मच्छीमार नगर हे कुलाबा परिसरातील मोठा कोळीवाडा असून याचं सुशोभीकरण करण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. पर्यटनाच्या माध्यमातून आदर्श कोळीवाडा बघण्यासाठी पर्यटकांनी यावं या अनुषंगाने या परिसराचं सुशोभीकरण सध्या सुरू आहे. या कामात काही विलंब होत होता आणि त्यासाठी त्या विकास कामात अडचण निर्माण करण्याचा काही लोकांकडून प्रयत्न केला जात होता. त्या लोकांची कान उघाडणी करण्याची गरज होती आणि ती मी केली होती. आज पुन्हा काम कुठपर्यंत आलं याचा आढावा घेण्यासाठी आलो होतो. समाधानकारक काम सुरू असून पुढील दोन महिन्याच्या आत संपूर्ण काम पूर्ण होईल आणि सुशोभित असा कोळीवाडा मुंबईकरांसाठी आपण उपलब्ध करून देऊ, असा विश्वास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केला.

हेही वाचा:

  1. Sanjay Raut News : उडता पंजाबप्रमाणे उडता महाराष्ट्र करायचा प्लॅन आहे का- खासदार संजय राऊत
  2. Uddhav Thackeray VS Eknath Shinde : शिंदे गटानं शिवाजी पार्कचा आग्रह का सोडला? अनिल परब यांनी 'हे' सांगितले कारण
  3. Dada Bhuse Lalit Patil Photo : ड्रग्ज माफिया ललित पाटीलसोबत मंत्री दादा भुसेंचा फोटो व्हायरल; सुषमा अंधारे म्हणाल्या...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.