ETV Bharat / state

Devendra Fadnavis : एकनाथ शिंदे अपात्र झाले तरी...; उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला 'प्लॅन बी'

Devendra Fadnavis On CM Shinde : शिवसेनेच्या १६ अपात्र आमदारांचा निर्णय कधीही येण्याची शक्यता आहे. या निर्णयानंतर (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटाचे आमदार अपात्र होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. (MLA disqualification decision) परंतु, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याला साफ नकार दिलाय. तसेच असं झालं तरी एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात, असं स्फोटक विधान त्यांनी केलंय.

Devendra Fadnavis On CM Shinde
मुख्यमंत्री शिंदे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 28, 2023, 9:56 PM IST

मुंबई Devendra Fadnavis On CM Shinde : आमदार अपात्र प्रकरणी कधीही निर्णय होऊ शकतो व हा निर्णय कदाचित उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं लागून शिंदे गटाचे 16 आमदार मुख्यमंत्र्यांसहित अपात्र होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. (Devendra Fadnavis) या विषयावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्यांना कोर्ट समजते, ज्यांनी सर्वोच्च न्यायालयाची व निवडणूक आयोगाची प्रत वाचली असेल, त्यावरून शिंदे हे अपात्र होऊ शकत नाहीत. (Fadnavis On MLA Disqualification) परंतु, तो सर्वस्वी निर्णय विधानसभा अध्यक्षांचा आहे. शिंदे अपात्र झाले तरी काही अडचण नाही. विधान परिषदेवर ते निवडून येऊ शकतात.

अजित पवार मुरलेले राजकारणी : अजित पवार हे राजकारणात मुरलेले राजकारणी आहेत. त्यांना राजकारण समजते. आमच्याकडे 'प्लान बी'ची आवश्यकता नाही. आमच्याकडे 'प्लान ए' एकच आहे. बहुतांश लोकांवर काही आरोप नाहीत. तरीसुद्धा ते भाजपासोबत आले. कारण त्यांना माहिती आहे की महाराष्ट्रात विकास फक्त भाजपा करू शकते, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सदावर्ते हा कोणाचा माणूस? : सदावर्ते यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, कुठल्याही हिंसेचं समर्थन केलं जाणार नाही. पण, सदावर्ते यांनीसुद्धा ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, एखाद्या समाजाच्या विरोधात किती बोलावं व इतकं का बोलावं. २७ जून २०१९ ला मराठा आरक्षण मी मुख्यमंत्री असताना दिलं होतं. ते वैध ठरवण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं दिला. त्या दरम्यान सदावर्ते यांनी माझ्यावर आरोप केले होते की फडणवीस यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे. यांनी न्यायालयावर दबाव टाकला की, माझी सीबीआय चौकशी करावी. तेव्हा त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही टीका केली होती. फडणवीस पुढे म्हणाले, सदावर्ते यांची भूमिका सातत्याने बदलत असते. त्यांना व्यक्तिगत जीवनात मी फक्त दोनदा भेटलो आहे. माझा सदावर्ते यांच्याशी काही संबंध नाही. तो कोणाचा माणूस हे सर्वांना ठाऊक असेल.

त्यासाठी सर्वस्व पणाला लावू : मराठा आरक्षणाच्या लढाईबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, १९८० साली मराठा आरक्षणाची लढाई सुरू झाली. १९८३ साली अण्णासाहेब पाटलांनी स्वतःचा जीव त्यासाठी दिला. तेव्हापासून ही लढाई अजून तीव्र झाली. आज आम्ही ७० हजार उद्योजकांना ५ हजार कोटीचं कर्ज उपलब्ध केलं. त्याप्रमाणे २ लाख लोकांना रोजगार भेटले. मराठा समाजासाठी अनेक योजना सुरू केल्या. याचा परिणाम असा झाला की, मराठा नेत्यांना त्यांच्या समाजाची लोक विचारू लागली की, तुम्ही आमच्यासाठी काय केलं. म्हणून मला टार्गेट करण्याचा प्रयत्न होत आहे.

हेही वाचा:

  1. CM Kolhapur Visit : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 'दबक्या पावला'नं कोल्हापूरात, दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता
  2. Narayan Rane : मराठा समाजाबद्दल नारायण राणेंचं शिवराळ विधान; मराठा कार्यकर्ते आक्रमक
  3. Uday Samant : काही ठिकाणी मराठा आरक्षणाचा उद्रेक होणे स्वाभाविक - मंत्री उदय सामंत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.