मुंबई - भाजपने गुरुवारी सर्व १०५ आमदारांसह सहकारी पक्षांच्या आमदार आणि समर्थन दिलेल्या सर्व आमदारांची बैठक घेतली. ही बैठक संपल्यानंतर भाजप आमदार आशिष शेलार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आम्ही सत्ता स्थापनेच्या नाटकावर लक्ष ठेवून आहोत, अशी प्रतिक्रिया दिली.
भाजप, मित्रपक्ष आणि अपक्ष आमदारांची बैठक गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली होती. या बैठकीनंतर बोलताना शेलार म्हणाले, भाजप सत्ता स्थापनेच्या तीन अंकी नाटकावर लक्ष ठेवून आहे. तसेच अन्य पक्षांच्या चर्चा तसेच राजकीय परिस्थितीवर देखील नजर आहे.
हेही वाचा - पालिकेच्या कंत्राटदारांवर प्राप्तीकराच्या धाडी सुरूच; ईडीही गुन्हा दाखल करण्याची शक्यता
या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आल्याचे शेलार यांनी सांगितले. यामध्ये राज्यभरात 90 हजार बूथवर भाजपच्या संघटनात्मक निवडणुका होणार आहेत. येत्या महिन्याभरात सर्व आमदार पक्ष मजबूत करण्यासाठी या 90 हजार बूथवर विविध कार्यक्रम राबवणार आहेत. तसेच सर्व आमदार सलग २ ते ३ दिवस नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी दौरा करणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.
हेही वाचा - भाजपच्या नवनिर्वाचित 105 आमदारांची 'वसंत स्मृती' येथे बैठक