मुंबई - मुंबईत झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दोन तीन तासांच्या पावसाने मुंबईत पाणी साठले आहे. यासंबधीचा मुद्दा काँग्रेसचे आमदार अमिन पटेल यांनी विधानसभेत उपस्थित केला. यावेळी अमिन यांनी पालिका आयुक्तांना बोलवून मुंबईत न झालेल्या नालेसफाईची माहीती घ्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली.
मुंबईत झालेल्या पावसाचा परिणाम रेल्वे आणि वाहतूकीवर झाला आहे. हाच मुद्दा आमदार अमिन पटेल यांनी विधानसभेत उपस्थित केला. यावेळी पटेल यांनी महानगरपालिकेने पाठवलेला एसएमएस वाचून दाखवला. यावेळी पटेल यांनी पालिका आयुक्तांना बोलवून मुंबईत न झालेल्या नालेसफाईची माहीती घ्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.