ETV Bharat / state

'पोस्ट आणि बँक कर्मचाऱ्यांना मुंबईत लोकल प्रवासाला परवानगी द्या'

मुंबई अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी रेल्वेची लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, यामध्ये पोस्ट ऑफिस आणि बँक कर्मचाऱ्यांना परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे तातडीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून या दोन्ही सेवेतील कर्मचाऱ्यांना मुंबईत रेल्वेचा लोकल प्रवासाची परवानगी द्यावी, अशी विनंती आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

'पोस्ट आणि बँक कर्मचाऱ्यांना मुंबईत लोकल प्रवासाला परवानगी द्या'
'पोस्ट आणि बँक कर्मचाऱ्यांना मुंबईत लोकल प्रवासाला परवानगी द्या'
author img

By

Published : Jun 23, 2020, 7:16 PM IST

मुंबई - लॉकडाऊन दरम्यान पोस्ट ऑफिस आणि बँकेचे व्यवहार भारताच्या आर्थिक राजधानी मुंबईत अखंडितपणे सुरू आहे. तर, मुंबई उपनगरीय रेल्वे गाड्यांमधून इंडिया पोस्ट आणि बँक कर्मचाऱ्यांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र आज भाजप नेते आमदार अ‌ॅ‌‌ड. आशिष शेलार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लिहिले आहे.

मुंबई अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी रेल्वेची लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, यामध्ये पोस्ट ऑफिस आणि बँक कर्मचाऱ्यांना परवानगी देण्यात आलेली नाही. याबाबत भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता आणि रेल्वेशी संपर्क साधला असता याबाबतची परवानगी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात येते, असे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे तातडीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून या दोन्ही सेवेतील कर्मचाऱ्यांना मुंबईत रेल्वेचा लोकल प्रवासाची परवानगी द्यावी, अशी विनंती आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

लॉकडाऊन काळात बँकांनी आपले व्यवहार नियमित सुरू ठेवले असून त्यासोबत पोस्टाने ही विविध टपाल सेवा, पेंशन, वैद्यकीय साधनांची ने-आण या कार्यात मोठा सहभाग नोंदवला आहे. या लॉकडाऊन काळात ज्येष्ठ नागरिक पेन्शन व केंद्र शासनाकडून देण्यात आलेली सुमारे 590 कोटींची आर्थिक मदत घरोघरी पोहचवण्याचे काम बँक व पोस्टाने केले. मुंबईत या सेवेत असणारे कर्मचारी उपनगर व आजूबाजूच्या परिसरात राहत असून त्यांना प्रवासाला उपनगरीय रेल्वे सेवेत परवानगी देणे आवश्यक आहे. त्यामुळे, अधिक संख्येने हे कर्मचारी हजर होऊ शकतील म्हणून ही परवानगी देण्यात यावी, अशी विनंती आमदार अ‌ॅड. आशिष शेलार यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.