ETV Bharat / state

Teachers Issue : आंतरजिल्हा बदल्याशिवाय शिक्षक भरती नको, विधानसभेत आमदारांची मागणी

आमदार अभिमन्यू पवार यांनी विधानसभेत शिक्षकांच्या बदल्यांकडे लक्ष वेधताना सांगितले की, नवीन शिक्षक भरती करण्यापूर्वी आंतरजिल्हा बदल्या कराव्यात. अनेक वर्षांपासून पती-पत्नी वेगवेगळ्या जिल्ह्यात आहेत. त्यामध्ये दिव्यांगांचाही समावेश आहे. त्यामुळे आधी त्यांच्या बदल्या कराव्यात, मगच नवीन शिक्षक भरती करावी, असे त्यांनी सांगितले.

teacher transfer issue
बदल्याशिवाय शिक्षक भरती नको
author img

By

Published : Jul 26, 2023, 6:22 PM IST

मुंबई : राज्यात तीस हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे. पण त्याआधी शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीवर बंदी आणली आहे. जुन्या शिक्षकांना बदली जिल्हा निवडण्याची एकमेव व शेवटची संधी दिली जाणार असल्याचे, महिनाभरापूर्वी स्पष्ट करण्यात आले होते. अनेक शिक्षकांची आंतरजिल्हा बदलीची मागणी असल्याने आधी या बदल्या कराव्यात, मगच नवीन शिक्षक भरती करावी, अशी मागणी विधानसभेत आमदार अभिमन्यू पवार यांनी केली.

आंतरजिल्हा बदली बंदीबाबत शासन निर्णय : राज्य सरकारने मागील महिन्यात आंतरजिल्हा बदली बंदीबाबत शासन निर्णय जाहीर केला होता. जुन्या शिक्षकांपैकी बदली इच्छूक शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीची एकच संधी दिली जाणार, असे म्हटले होते. ज्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची २०२२ मधील कार्यवाही पूर्ण झाली आहे, मात्र विनंती बदली मिळालेली नाही. त्या शिक्षकांना प्रतिक्षायादी प्रमाणे नियुक्ती दिली जाणार असल्याचेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

या शिक्षकांना राजीनामा द्यावा लागणार : नव्याने भरती होणाऱ्या शिक्षकांना मात्र आंतरजिल्हा बदली मिळणार नाही. या शिक्षकांना अशी बदली हवी असल्यास राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यांना पुन्हा नव्याने भरतीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी लागणार असल्याचे, विभागाने स्पष्ट केले आहे. शिक्षण विभागाने याबाबत ग्रामविकास विभागाने सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

शासन निर्णय जारी : राज्यामधील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली बाबत अनेक वर्षापासून सातत्याने शासनाकडे पाठपुरावा सुरू होता. अनेकदा न्यायालयांमध्ये देखील हे वाद सोडवण्याचा प्रयत्न झाला. अखेर शासनाने बुधवारी उशिरा याबाबत शासन निर्णय जारी करत नवीन जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली बाबतच्या सुधारित अटी लागू केल्या होत्या. आता जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या बंद होणार, असा महत्वपूर्ण निर्णय शासनाने मंजूर केला होता.

हेही वाचा -

  1. Monsoon Session 2023: शिक्षण पद्धती व शिक्षकांच्या प्रश्नांवर एक दिवसाची विशेष बैठक घेणार- शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन
  2. Monsoon Session 2023 : बोगस खते बियाणांच्या प्रश्नावर विधानसभेत गदारोळ
  3. Monsoon Session 2023: राष्ट्रवादीत दोन्ही गटाकडून व्हिप जारी केल्याने आमदारांमध्ये संभ्रम; विधीमंडळातही विधानसभा अध्यक्षांसमोर असणार 'हा' पेच

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.