ETV Bharat / state

Miyawaki forest mandatory इमारतीचे बांधकाम करताना खुल्या जागेत मियावाकी वन बंधनकारक, मुंबई महापालिकेचा निर्णय - इमारतीचे बांधकाम

मुंबई शहर हे सर्वात जास्त लोकसंख्या ( Miyawaki Forest Mandatory At Mumbai ) असलेले शहर म्हणून ओळखले जाते. मात्र या शहरातील लोकसंख्येच्या प्रमाणात झाडे नसल्याने नागरिकांकडून चिंता व्यक्त करण्यात येते. आता मात्र महापालिकेने इमारतीचे बांधकाम करताना मोकळ्या जागेत मियावाकी पद्धतीने (Miyawaki Method ) झाडे लावणे बंधनकारक ( BMC mandatory Miyawaki forest At Mumbai ) केल्याची माहिती उद्यान विभागाच्या जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे. त्यामुळे मुंबई शहरात आता हिरवळ वाढेल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

Miyawaki forest mandatory At Mumbai
मियावाकी वनांचे संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jan 9, 2023, 7:15 PM IST

मुंबई - शहरात लोकसंख्येच्या प्रमाणात झाडांची संख्या कमी आहे. हिरवळ निर्माण व्हावी यासाठी महापालिकेकडून सतत प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून १० हजार चौरस मीटर पेक्षा अधिक आकाराच्या भूखंडावर इमारतीचे बांधकाम करताना ( Miyawaki Forest Mandatory At Mumbai ) भूखंडाच्या खुल्या क्षेत्रावरील काही भागात मियावाकी वन (Miyawaki Method ) विकसित करणे आता बंधनकारक करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या ( BMC Officer ) उद्यान विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.

हिरवळ वाढीसाठी प्रयत्न मुंबईमध्ये २०११ च्या जनणगनेनुसार १ कोटी ३० लाख नागरिक राहतात. लोकसंख्येच्या तुलनेत मुंबईत केवळ ३० लाख झाडे आहेत. गेल्या काही वर्षात मियावाकी पद्धतीने ४ लाख झाडे लावण्यात आली आहेत. मुंबईमध्ये हिरवळ वाढावी यासाठी महापालिकेने ( BMC mandatory Miyawaki forest At Mumbai ) नुकतीच एक कार्यशाळा आयोजित केली होती. त्यात टेरेस गार्डन, खिडकीमध्ये झाडे लावणे, पुलाखाली झाडे लावणे, मियावाकी पद्धतीने झाडे लावणे आदी सूचना तज्ज्ञांनी दिल्या आहेत. याबाबत एक कृती आराखडा बनवून त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती परदेशी यांनी दिली.

काय आहे नवा निर्णय महापालिका क्षेत्रातील हरित क्षेत्रात वाढ होण्यासह पर्यावरणाचे संवर्धन व्हावे, यासाठी महापालिका आयुक्त डॉक्टर इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या निर्देशानुसार महानगरपालिकेने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महापालिका क्षेत्रातील पर्यावरणावर अत्यंत सकारात्मक परिणाम करणाऱ्या या निर्णयांतर्गत १० हजार चौरस मीटर पेक्षा अधिक आकाराच्या भूखंडावर इमारतीचे बांधकाम करताना भूखंडाच्या खुल्या क्षेत्रावरील काही भागात मियावाकी वन विकसित करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. अत्यंत कमी जागेत अधिकाधिक वृक्ष लागवड करण्याच्या या पद्धतीमुळे महापालिका क्षेत्रातील पर्यावरण संवर्धनास निश्चितच गती मिळेल, असा विश्वास परदेशी यांनी यानिमित्ताने व्यक्त केला आहे.

५ टक्के आकाराचे मियावाकी वन महापालिका क्षेत्रातील १० हजार चौरस मीटर आकाराच्या भूखंडावर इमारत बांधकाम करताना विकास नियंत्रण नियमावलीच्या संबंधित नियमांनुसार निर्धारित आकाराची जागा ही खुले क्षेत्र (Layout Open Space) असणे बंधनकारक आहे. यानुसार खुल्या क्षेत्रासाठी जेवढी जागा निर्धारित करण्यात येईल, त्या जागेच्या ५ टक्के आकाराचे मियावाकी वन विकसित करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. हे मियावकी वन विकसित करण्यासाठी संबंधित विकासकाला काही तांत्रिक मार्गदर्शन लागल्यास त्याची माहिती उद्यान विभागाद्वारे देण्यात येणार आहे. महापालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाला बांधकाम परवानगी (IOD) विषयक अटींमध्ये मियावाकी वन विकसित करण्याच्या अटींचा समावेश करण्याचे निर्देशही महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार देण्यात आले आहेत, असेही परदेशी यांनी सांगितले.

काय आहे मियावाकी पद्धत सामान्य वनांच्या तुलनेत मियावाकी पद्धतीने विकसित करण्यात येणाऱ्या वनांमधील झाडे ही अधिक वेगाने वाढतात. एरवी सामान्य पद्धतीने लावलेले झाड वाढण्यास जेवढा कालावधी लागतो, त्या तुलनेत साधारणपणे निम्म्यापेक्षा कमी कालावधीत तेवढ्याच उंचीचे झाड वाढते. तसेच साधारणपणे २ वर्षात विकसित होणाऱ्या मियावाकी पद्धतीच्या वनांमध्ये झाडांमधील अंतर हे कमी असल्याने ती घनदाट असतात. या वनांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सुरुवातीची साधारणपणे दोन किंवा तीन वर्षे या वनांची नियमित देखभाल करावी लागते. त्यानंतर ही वने नैसर्गिकरित्या वाढत राहतात आणि आपल्याला अव्याहतपणे प्राणवायू देत राहतात. ही बाब लक्षात घेतल्यास मुंबईतील मियावाकी वनांना मुंबई शहराची फुफ्फुसे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.