ETV Bharat / state

मुंबई : तब्बल अडीच वर्षांनी चिमुकल्याची पालकांशी भेट; व्हाट्सप झाला देवदूत

व्हाट्सप ग्रुपच्या मदतीने कुर्ला नेहरूनगर पोलिसांनी तब्बल अडीच वर्षांनी एका चिमुकल्याची त्याच्या पालकांशी भेट घडवून आणली. शुभम मांडवकर, (वय ५ वर्ष ६ महिने) असे त्या मुलाचे नाव आहे.यावेळी शुभमच्या पालकांनी पोलिसांचे आभार मानले.

शुभम मांडवकर
author img

By

Published : May 31, 2019, 12:03 PM IST

Updated : Jun 1, 2019, 9:38 PM IST

मुंबई - सध्या सोशल मीडिया हा प्रत्येकाच्या जीवनाचा एक भाग झाला आहे. या माध्यमातून अनेक चांगल्या-वाईट घटना घडत असतात. अशीच एक घटना शहरात घडलेली पाहायला मिळाली. व्हाट्सप ग्रुपच्या मदतीने कुर्ला नेहरूनगर पोलिसांनी तब्बल अडीच वर्षांनी एका चिमुकल्याची त्याच्या पालकांशी भेट घडवून आणली.

तब्बल अडीच वर्षांनी चिमुकल्याची पालकांशी भेट

शुभम मांडवकर, (वय ५ वर्ष ६ महिने) असे त्या मुलाचे नाव आहे. नेहरूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कुर्ला रेल्वे स्थानकाजवळ शुभम हा तीन वर्षाचा असताना २२ मार्च २०१६ पासून हरवला होता. याबाबत वडिलांनी नेहरूनगर पोलीस ठाण्यात शुभम हरवल्याची तक्रार दिली होती.

नेहरूनगर पोलिसांनी नव्याने शोध घेत पोलिसांच्या महाराष्ट्र व्हाट्सअप ग्रुपवर ही माहिती पाठवली. अडीच वर्षापूर्वी रेल्वे सुरक्षा बलाला रेल्वेमध्ये सापडलेला मुलगा अकोला येथील उत्कर्ष शिशुगृह या ठिकाणी असल्याची माहिती मिळाली.शुभमची फोटोवरून ओळख पटवणे कठीण होत असल्यामुळे त्यांनी अकोला जिल्हा बालकल्याण अधिकारी आणि पोलिसांच्या मदतीने शुभमच्या पालकांना अकोला येथे पाठवले. दरम्यान चिमुकल्याची ओळख पटली आणि तब्बल अडीच वर्षांनी शुभमची त्याच्या पालकांशी भेट झाली. यावेळी शुभमच्या पालकांनी पोलिसांचे आभार मानले.

Intro:व्हाट्सप ग्रुप ने घडवले अडीच वर्षांनंतर चिमुकल्याची पालकांशी भेट.

व्हाट्सप ग्रुप च्या माध्यमातून पोलिसानी हरवलेल्या मुलाची तब्बल अडीच वर्षांनी त्याच्या पालकांशी भेट घालून दिली.कुर्ला नेहरूनगर पोलिसानी शुभम मांडवकर वय साडेपाच वर्षे या मुलाला अकोल्याच्या उत्कर्ष शिशुग्रहातून शोधून काढत त्यास त्याच्या पालकांकडे सुपूर्त करण्यात आलेBody:व्हाट्सप ग्रुप ने घडवले अडीच वर्षांनंतर चिमुकल्याची पालकांशी भेट.

व्हाट्सप ग्रुप च्या माध्यमातून पोलिसानी हरवलेल्या मुलाची तब्बल अडीच वर्षांनी त्याच्या पालकांशी भेट घालून दिली.कुर्ला नेहरूनगर पोलिसानी शुभम मांडवकर वय साडेपाच वर्षे या मुलाला अकोल्याच्या उत्कर्ष शिशुग्रहातून शोधून काढत त्यास त्याच्या पालकांकडे सुपूर्त करण्यात आले.

नेहरूनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कुर्ला रेल्वे स्थानकाजवळ शुभम हा तीन वर्षाचा असताना 22 मार्च 2016 पासून हरवला होता .शुभम चे पालक मोलमजुरी करून संसार चालवत होते .वडिलांनी याबाबतीत नेहरूनगर पोलीस ठाण्यात शुभम हरवल्याची तक्रार दिली .पोलिसांनी सगळीकडे शोधाशोध करूनही शुभम काही सापडला नव्हता .मात्र मुलगा कधी ना कधी भेटलच या आशेवर आई वडील होते .पोलिस सतत प्रयत्न करीत होते . नेहरूनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हरवलेल्या व्यक्तीच्या शोध घेणाऱ्या विभागाचे पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नव्याने शोध सुरू केला. यावेळी त्यांनी पोलिसांच्या महाराष्ट्र व्हाट्सअप ग्रुप वर ही माहिती पाठवली. रेल्वे सुरक्षा बलाला अडीच वर्षापूर्वी रेल्वेमध्ये सापडलेला मुलगा अकोला येथील उत्कर्ष शिशू ग्रह या ठिकाणी असल्याची माहिती मिळाली .फोटो वरून ओळख पटवणे कठीण होते यावेळी अकोला जिल्हा बालकल्याण अधिकारी आणि पोलिसांच्या मदतीने शुभमच्या पालकांना अकोला येथे पाठवून या चिमुकल्या ची ओळख पटवून घेतली यावेळी शुभमच्या पालकाने पोलिसांचे आभार मानले.Conclusion:
Last Updated : Jun 1, 2019, 9:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.