मुंबई: आपल्यावर हत्येचा आरोप होईल, याची भीती वाटत असल्याने असे कृत्य केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. हत्येचा आरोप होईल या भीतीने मृतदेहाची विल्हेवाट लावणे व दुर्गंधी टाळण्यासाठी तिच्या शरीराचे तुकडे केले. त्यानंतर प्रेशर कुकरमध्ये उकळल्याची आरोपीने कबुली दिली आहे. या प्रकारानंतर त्याने आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला होता. केलेल्या कृत्याबद्दल त्याला खेद वाटत नाही, असे मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांनी सांगितले.
सरस्वतीची हत्या की खून, याबाबत पोलीस पडताळणी करत आहेत. सानेने बहुतेक 4 जून रोजी वैद्यची हत्या करून शरीराच्या अवयवांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, सरस्वतीने आत्महत्या केल्याचे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र सखोल चौकशीनंतर सत्य बाहेर येईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. घरातून सापडलेल्या मृतदेहाचे तुकडे शवविच्छेदनासाठी जेजे रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. त्याच्या आत्महत्येच्या दाव्याबाबत संशय असल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.
गुन्ह्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही: साने कधीही भटक्या कुत्र्यांना खायला देत नव्हता. मात्र, त्याने अचानक कुत्र्यांना खाऊ घालण्यास सुरुवात केली होती. ही माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. सानेविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 302 (खून) आणि 201 (पुरावा नष्ट करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, गुन्ह्यामागील हेतू अद्याप समजू शकलेला नाही, असे नया नगर पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्याने सांगितले. साने हा रेशन दुकानात काम करत होता.
फ्लॅटमधील दृश्य होते खळबळजनक: बुधवारी सानेच्या फ्लॅटमधून शेजाऱ्याला दुर्गंधी आल्यानंतर या गुन्ह्याला वाचा फुटली. शेजाऱ्यांनी दुर्गंधीबाबत विचारले सानेला भीती वाटली. त्यानंतर साने काळ्या रंगाची सॅक घेऊन घराबाहेर पडला. त्यानंतर शेजाऱ्यांना काहीतरी चुकीचे घडत असल्याची जाणीव झाली. पोलिसांना फ्लॅटमध्ये आल्यानंतर किचन प्लॅटफॉर्मवर, प्रेशर कुकरमध्ये आणि काही भांड्यात महिलेचे केस दिसले. तसेच जमिनीवर पडलेले उकडलेले मानवी मांस आढळले. अर्धी जळालेली हाडे आणि मांस सिंक, बादल्या आणि टबमध्ये ठेवण्यात आले होते, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
पीडिता होती अनाथ-पीडिता पूर्वी रिवलीच्या पश्चिम उपनगरातील एका आश्रमात राहत होती. साने काम करत असलेल्या रेशन दुकानात अनेकदा जात होती. त्यांच्यातील मैत्री 2014 नंतर वाढत गेली. ते दोघे 2016 पासून एकत्र राहहत होते. तीन वर्षांपूर्वी मीरा रोडच्या फ्लॅटमध्ये राहायला गेले, असे शेजाऱ्यांनी सांगितले. दोघांचे भांडण झालेले कधीही ऐकले नाही, असे शेजाऱ्यांनी सांगितले आहे. सरस्वती त्याच्याबरोबर मीरा रोड पूर्व येथील गीता आकाशदीप इमारतीच्या सातव्या मजल्यावर फ्लॅट क्रमांक ७०४ मध्ये राहत होती.
आतापर्यंत काय समोर आले आहे?
- श्रद्धा वालकर या भयानक हत्याकांडाहून मीरा रोड हत्याकांड भयानक असल्याची माहिती समोर आल्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली होती.
- मागील ३ वर्षांपासून साने व वैद्य लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.
- आरोपीने महिलेच्या शरीराचे तुकडे करून कुकरमध्ये शिजविले. पुरावा नष्ट करण्यासाठी शरीराचे तुकडे कुत्र्याला खायला दिले.
- ही हत्या चार दिवसांपूर्वी झाल्याचे नया नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी सांगितले.
- मृतदेहाचे गायब झालेले अवशेष शोधणे हे पोलिसांसाठी एक आव्हान असणार आहे.
हेही वाचा-