नवी मुंबई : साहिल शांताराम गोळे या 17 वर्षीय मुलाची दगडाने ठेचून हत्या (minor killed by his own friends) करणाऱ्या आरोपीच्या कोपरखैरणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या (Minor Boy Murderers arrested) आहेत. सनी पवार या वीस वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली असून इतर तीन अल्पवयीन आरोपींची (Koparkhairane police arreste) रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. कोपरखैरणे सेक्टर २३ येथील भूमिपुत्र मैदानात साहिलचा मृतदेह आढळून आला होता. (Latest News from New Mumbai) (murder by juvenile accused)
मृताच्या वैद्यकीय अहवालाने तपासाची दिशा बदलली- सुरवातीला मृतक साहिलच्या डोक्यात दगड घालून ठार केल्याचे पोलिसांनी सांगितले होते. मात्र वैद्यकीय तपासणीत त्याला अगोदर भोकसण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास करताना तांत्रिक तपासाची व खबऱ्यांची मदत घेण्यात आली, त्यात साहिलच्या एका सतरा वर्षीय मित्राकडे संशयाची सुई फिरली. पोलिसांनी त्याला शोधून काढले. या अल्पवयीन आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहिती वरून अन्य तीन आरोपींना पकडण्यात आले या मध्ये सनी पवार या वीस वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली तर तीन अल्पवयीन आरोपींची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.
क्रूरपणे हत्या - या आरोपींपैकी एका अल्पवयीन मुलाचे आणि मयत साहिलचे काही वाद होते. हे वाद मिटवण्यासाठी साहिलला मंगळवारी रात्री सेक्टर २३ च्या भूमिपुत्र मैदानात बोलावण्यात आले. मात्र वाद काही मिटले नाहीत. उलट आरोपींनी आपल्या सोबत आणलेल्या चाकूने साहिलला भोसकले आणि खाली पाडत जवळच पडलेला मोठा दगड त्याच्या डोक्यात घालून हत्या केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी दिली.