मुंबई: प्रत्यक्षदर्शी पीडित मुलीच्या बहिणीने दिलेल्या माहितीप्रमाणे, मृत मुलगी ही तिची धाकटी 14 वर्षांची बहीण आणि मैत्रिणींसह काल (रविवारी) रात्री आठ साडेआठच्या सुमारास लोढा परिसरात फेरफटका मारण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान, मृत मुलीचा पूर्वीचा प्रियकर तेथे आला आणि त्याने मुलीशी वाद घालत तिला मारहाण केली. त्यावर पीडित मुलीने मामाला बोलवेन असे सांगितले असता आरोपीने मुलीच्या मामाला आणि तिला कापून टाकण्याची धमकी दिली. यानंतर त्याने मुलीला, तिच्या अल्पवयीन मैत्रिणींना आणि धाकट्या बहिणीला मोबाईलमध्ये मुलीसोबत घेतलेले खासगीतले फोटो आणि व्हिडिओ दाखवून ते वायरल करण्याची धमकी दिली. या संपूर्ण प्रकरणानंतर पीडित मुलगी रात्री साडेनऊच्या सुमारास घरी गेली. पीडितेने आपल्या धाकट्या बहिणीला तिच्या प्रियकराला सोडू नकोस, असे सांगितले आणि ती गच्चीवर गेली. यानंंतर तिने आत्महत्या केली.
छेडछाडीला कंटाळून आत्महत्या: पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बोरी येथील अल्पवयीन मुलीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बुधवारी (दि. १२) सायंकाळी ५ च्या दरम्यान हा प्रकार घडला. या प्रकरणी भवानीनगर पोलिस चौकीमध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत्यूपूर्वी लिहिली चिट्ठी: शाळेत जात असताना गावातील तीन टवाळखोर मुलांनी या अल्पवयीन मुलीची छेड काढल्याची माहिती समोर आली. मुलांच्या छेडछाडीला कंटाळून तिने बुधवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी मुलीने, मला माहित आहे माझे चुकते, पण आई - वडिलांच्या प्रतिमेला धक्का लागू नये म्हणून आत्महत्या करत असून गावातल्या 'आब्या' मुळे आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीत नमूद केले आहे.
पीडितेची आत्महत्या - मृत मुलगी आपली धाकटी 14 वर्षाची बहीण आणि मैत्रिणी यांच्यासह रविवारी रात्री आठ साडेआठच्या सुमारास फेरफटका मारण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान, मृत मुलीचा माजी प्रियकर हा तेथे आला. त्यानंतर त्याने तेरा वर्षीय मुलीशी वाद घातला. नंतर जोरात कानाखाली लगावली. त्यावर पीडित मुलीने मामाला बोलवेन असं सांगितले. त्यावर मामा आणि तुला कापून काढेल असे संशयित आरोपी याने सांगितले. पीडित मुलीसोबत असलेल्या मैत्रिणींना आणि धाकट्या बहिणीला आरोपीने मोबाईलमध्ये असलेले खासगीतले फोटो आणि व्हिडिओ दाखवून व्हायरल करण्याची धमकी दिली असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी पीडित मुलीच्या बहिणीने दिली. त्यानंतर साडेनऊच्या सुमारास घरी गेल्यानंतर 16 वर्षीय मुलीने आपल्या धाकट्या बहिणीला त्या संशयित आरोपीला सोडू नकोस असे सांगून गच्चीवर गेली आणि गच्चीवरून उडी मारून आपले आयुष्य संपवलं.
नागपुरात अल्पवयीन मुलीची आत्महत्या: नागपूर शहरातील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मात्र आत्महत्येचा घटनाक्रम हा संशयास्पद वाटतं असल्यामुळे पोलिसांनी घटनेचा सखोल तपास सुरू केला असता अतिशय धक्कादायक खुलासा झाला आहे. १६ वर्षीय मुलीने आत्महत्या केली नसून तिच्या वडिलांनीचं तिची हत्या केल्याची बाब तपासात उघड झाली आहे. एवढंचं नाही तर या संपूर्ण प्रकरणात मृतक मुलीच्या बहिणीचा देखील सहभाग आढळून आल्यामुळे आता कळमना पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून त्या बापाला अटक केली आहे.