ETV Bharat / state

Ministry of Mines : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार खनीकर्म खात्याचा पदभार

Ministry of Mines : राज्य मंत्रिमंडळाच्या नव्याने झालेल्या खाते वाटपानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेली अनेक खाती वितरित करण्यात आल्यानंतर देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अनेक खात्यांचा पदभार आहे. खनिजावर आधारित नवीन उद्योग येणार असल्यानं राज्यात नव्याने स्वतंत्र करण्यात आलेल्या या खात्याची जबाबदारी स्वतः मुख्यमंत्री घेणार आहेत.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 9, 2023, 6:42 PM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार खनीकर्मचा खात्याचा पदभार
Ministry of Mines

मुंबई (Ministry of Mines) : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विविध खात्यांचा पदभार आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सर्वच खाती त्यांच्या अधिपत्याखाली येतात. मात्र राज्यात खणीकर्म खातं आता स्वतंत्र करण्यात आल्यानं या खात्याचा भार मुख्यमंत्री स्वतःकडे घेणार असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिलीयं. खनिजावर आधारित नवीन उद्योग येणार असल्याने या खात्याची जबाबदारी स्वतः मुख्यमंत्री (Chief Minister Eknath Shinde) घेणार आहेत.

मुख्यमंत्र्यांकडे अनेक खात्यांचा पदभार : राज्य मंत्रिमंडळाच्या नव्याने झालेल्या खाते वाटपानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेली अनेक खाती वितरित करण्यात आली होती. तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती आणि तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सामाजिक न्याय, परिवहन, पर्यावरण व वातावरणीय बदल तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना नेमून न दिलेली खाते यांची जबाबदारी आहे. मात्र नजीकच्या भविष्यात खनिजावर आधारित नवीन उद्योग राज्यात मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामगार ऊर्जा आणि उद्योग या खात्यांशी संलग्न असलेल्या खनि कर्म या खात्याला आता स्वतंत्र दर्जा आणि विशेष लक्ष देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी घेतलायं.

मुख्यमंत्री घेणार जबाबदारी : राज्यात मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती उपलब्ध आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत छत्तीसगड, ओरिसा आणि मध्य प्रदेश या राज्यांची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात खनिज संपत्तीवर आधारलेली आहे. या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात खनिजाचे प्रमाण कमी असले तरी ते लक्षणीय आहे. राज्यातील चंद्रपूर, वर्धा, नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विविध प्रकारचे खनिज आणि गौण खनिज आढळुन येत. मात्र, खनिज पट्टे शोधण्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे या जिल्ह्यांमध्ये नेमके किती खनिज उपलब्ध आहे, याचा सर्वंकष आढावा अध्याप घेतला गेलेला नाही. आता खनिकर्म हे स्वतंत्र खाते करण्यात येत असल्याने खनिज संशोधन ते लिलावापर्यंतची सर्व जबाबदारी या खात्यावर सोपवण्यात आलीयं. महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्र पेट्रोल केमिकल्स महामंडळ हा उपक्रम खनि कर्म उपविभागाच्या पर्यवेक्षकीय नियंत्रणाखाली आणण्यात आलायं.

पायाभूत सुविधांचे जाळे : देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात खनिजाचे प्रमाण कमी असले तरी उद्योगाला आवश्यक असलेले वातावरण लागणाऱ्या पायाभूत सुविधा आणि रस्त्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात उपलब्ध आहे. त्यामुळे व्यवसायाशी निगडित कारखाने येथील औद्योगिक पट्ट्यामध्ये उभे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात नवीन खनि कर्म खात्याचा कारभार सुरू करण्यासाठी शासनाने स्वतंत्र सचिव तसेच सचिव कार्यालयासाठी आवश्यक असलेली पदं निर्माण केलीयं. यामध्ये खात्याला स्वतंत्र सचिव उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी लघुलेखक लिपिक टंकलेखक वाहन चालक आणि शिपाई ही पदे निर्माण केली असून, या पदांवर लवकरच नियुक्ती करून खात्याचा स्वतंत्र कारभार केला जाईल अशी माहिती मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिलीयं.

हेही वाचा :

  1. Sanjay Gaikwad On Raut : एकनाथ शिंदेंना लाचार म्हणणाऱ्या संजय राऊत यांनी आरशात तोंड बघावं- आमदार संजय गायकवाड
  2. Congress Leader Join Shiv Sena : राजस्थानात शिंदेच्या गळाला लागला मोठा मासा, कॉंग्रेसच्या 'या' बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
  3. CM Eknath Shinde : शरद पवार बोलतात त्याच्या उलटा अर्थ समजायचा; मुख्यमंत्री शिंदेंचा टोला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.