ETV Bharat / state

महाराष्ट्राला दिवसाला २६ नव्हे, तर ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन द्या - नवाब मलिक - महाराष्ट्र कोरोना न्यूज

केंद्राने जाहीर केलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शन वाटपावर राज्यमंत्री नवाब मलिक यांनी आक्षेप नोंदवला आहे. केंद्राने महाराष्ट्राला दिवसाला २६ नव्हे तर ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन द्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

Mumbai
Mumbai
author img

By

Published : Apr 22, 2021, 12:13 PM IST

मुंबई : केंद्राने जाहीर केलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शन वाटपावर राज्यमंत्री नवाब मलिक यांनी आक्षेप नोंदवला आहे. महाराष्ट्रात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे केंद्राने महाराष्ट्राला दिवसाला २६ नव्हे तर ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन द्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

Mumbai
Mumbai

केंद्र सरकारने नुकताच आपल्या देशातील विविध राज्यांना वाटप केलेला रेमडेसिवीर इंजेक्शनचा डेटा जाहीर केला. त्यावर नवाब मलिक यांनी जोरदार आक्षेप नोंदवला आहे. या डेटामध्ये राज्याला फक्त २६ हजार इंजेक्शन्स देणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे हे संकट अधिकच वाढेल, अशी भीती नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे.

Mumbai
Mumbai

'आतापर्यंत आम्हाला प्रतिदिन केवळ ३६ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्स आले आहेत. आता नवीन वाटपानुसार, महाराष्ट्रात दररोज केवळ २६ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्स प्राप्त होणार असल्याचे म्हटले आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकार देत असलेला साठा अपुरा पडणार आहे. यामुळे गंभीर समस्या निर्माण होणार आहे', असे नवाब मलिक म्हणाले.

केंद्र सरकारने राज्याला दररोज ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करावा, अशी मागणी ठाकरे सरकारने केली आहे. मात्र केंद्राने जाहीर केलेल्या डेटामध्ये फक्त २६ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन दिली जाणार आहे. इतकी कमी इंजेक्शन राज्यातील जनतेला पुरणार नाहीत. त्यामुळे केंद्र सरकारच्या या धोरणावर नवाब मलिक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.