ETV Bharat / state

अधिकार नसलेल्या मंत्र्यांना गंभीर घेऊ नये, नवाब मलिकांची रावसाहेब दानवेंवर सडकून टीका

'ज्या मंत्र्यांना अधिकार नाहीत ते फक्त बोलण्यासाठी मंत्री झाले आहेत. त्यांच्या बोलण्याला गंभीरतेने घेण्याची गरज नाही', असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपचे मंत्री रावसाहेब दानवे यांना लगावला आहे.

मलिक
मलिक
author img

By

Published : Aug 9, 2021, 6:59 PM IST

मुंबई - 'मोदीसाहेबांच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांना किती अधिकार आहेत. राज्यमंत्र्यांना किती अधिकार व कितीजण धोरण ठरवत आहेत हे देशातील प्रत्येक राजकीय लोकांना माहीत आहे. त्यामुळे ज्या मंत्र्यांना अधिकार नाहीत ते फक्त बोलण्यासाठी मंत्री झाले आहेत. त्यांच्या बोलण्याला गंभीरतेने घेण्याची गरज नाही', असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपचे मंत्री रावसाहेब दानवे यांना लगावला आहे. आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना मलिक यांनी रावसाहेब दानवे यांना हा टोला लगावला आहे.

नवाब मलिक

मोदी सरकारमधील मंत्र्याची टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईतील लोकल सेवा लसवंतांसाठी सुरू करण्याचा निर्णय घेतला. याची घोषणाही काल केली. त्यानुसार, १५ ऑगस्टपासून मुंबईतील लोकल रेल्वेने कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांना प्रवास करता येणार आहे. मात्र, यानंतर मोदी सरकारमधील रेल्वे राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानवे यांनी ठाकरे सरकारच्या या निर्णयावर टीका केली. ठाकरे सरकारकडून तसा कोणताही प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे आला नाही, अशी टीप्पणी रावसाहेब दानवे यांनी केली. त्यावर नवाब मलिक यांनी प्रतिहल्ला केला आहे.

सर्व माहिती राज्याकडून रेल्वे मंत्रालयाला जाणार- मलिक

'रावसाहेब दानवे हे रेल्वे राज्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांना किती अधिकार आहेत हे मला माहीत नाही. मात्र बोलून कामे होत नसतात. मुंबईतील अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी रेल्वे सुरू आहे. त्यात ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांना १५ ऑगस्टपासून प्रवेश देण्याची माहिती रेल्वेला राज्य सरकारकडून जाणार आहेच. ८ ऑगस्टला मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे. त्यामुळे तो प्रस्ताव जाणारच आहे', असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - बापरे... मुलगी टेरेसवरून पडली चौथ्या मजल्याच्या खिडकीवर, अग्निशमन दलाने बचावले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.