ETV Bharat / state

परभणी जिल्ह्यातील सेना-राष्ट्रवादीतील मतभेद दूर केले जातील - एकनाथ शिंदे

author img

By

Published : Aug 26, 2020, 8:08 PM IST

राष्ट्रवादीच्या विरोधात मतभेद निर्माण झाल्यामुळे खासदार संजय जाधव यांनी आज राजीनामा दिल्यानंतर या विषयी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे स्थानिक वाद चव्हाट्यावर आले आहेत. यासंदर्भात शिंदे यांनी सांगितले की, खासदार संजय जाधव यांनी राजीनामा दिला आहे, याची अद्याप मला माहिती नाही, ती माहिती घेऊन यावर मी बोलणार आहे.

minister eknath shinde said Disagreements between Sena and NCP in Parbhani district will be resolved
परभणी जिल्ह्यातील सेना-राष्ट्रवादीतील मतभेद दूर केले जातील - एकनाथ शिंदे

मुंबई - परभणी जिल्ह्याचे शिवसेना खासदार संजय जाधव यांनी राष्ट्रवादीच्या विविध विषयांवर असलेले मतभेद आणि त्यातून आलेल्या नाराजीमुळे आज आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला आहे. स्थानिक पातळीवर शिवसेना आणि राष्ट्रवादीत मतभेद असतील ते दूर केले जातील, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आघाडीतील इतर नेते यावर मार्ग काढतील, अशी प्रतिक्रिया नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात दिली.

राष्ट्रवादीच्या विरोधात मतभेद निर्माण झाल्यामुळे खासदार संजय जाधव यांनी आज राजीनामा दिल्यानंतर या विषयी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे स्थानिक वाद चव्हाट्यावर आले आहेत. यासंदर्भात शिंदे यांनी सांगितले की, खासदार संजय जाधव यांनी राजीनामा दिला आहे, याची अद्याप मला माहिती नाही, ती माहिती घेऊन यावर मी बोलणार आहे.

एकनाथ शिंदे बोलताना...
परभणी जिल्ह्यात स्थानिक पातळीवर जे काही मतभेद असतील ते दूर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. ते यावर सर्व मार्ग काढतील. त्यासोबतच आम्ही महाविकास आघाडी म्हणून आमचे आघाडीतील नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यासाठी आहेत. तेही याकडे पाहतील, असेही शिंदे यांनी सांगितले. महाविकास आघाडीतील सर्व नेते परभणीतील मतभेदाच्या विषयावर एकत्र बसून त्यावर चर्चा करू आणि मार्ग काढू, असे शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.हेही वाचा - सुशांतसिंह प्रकरण : महाराष्ट्राच्या सरकारला ड्रग्ज माफियांना व बड्या नेत्यांना वाचवायचं होतं का?; राम कदमांचा सवाल

हेही वाचा - मंदिरं सुरू करण्याच्या आंदोलनात भाजप कार्यकर्त्यांनी सक्रीय सहभागी व्हावे; चंद्रकांत पाटलांचे आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.