मुंबई - राज्यात रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनचा तुटवडा आहे. याबाबत राज्य सरकार पंतप्रधानांशी बोलत आहे. मात्र, केंद्राकडून राज्याला सहकार्य करताना दिसत नाही, असा आरोप मुंबईचे पालकमंत्री तथा वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांनी केला आहे. ते मुंबई मध्यमांसमोर बोलत होते.
विनाकारण फिरणाऱ्यांची वाहने होणार जप्त
संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींव्यतिरिक्त अनेकजण विनाकारण रस्त्यावर आपली वाहने घेऊन फिरत आहेत. त्यांना विचारणा करणाऱ्या पोलिसांसह ते हुज्जत घालत आहेत. पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असून विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांची वाहने जप्त करणार असल्याचेही मंत्री अस्लम शेख म्हणाले.
हेही वाचा - कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांचा प्रश्न गंभीर; हॉस्पिटलबाहेर सुरु आहे व्यवस्था
हेही वाचा - महाराष्ट्राच्या मदतीसाठी भारतीय रेल्वेची 'ऑक्सिजन एक्सप्रेस' धावणार