ETV Bharat / state

'केंद्राच्या कृषी कायद्यावर कुठलाही निर्णय नाही'

केंद्राच्या कृषी कायद्याबाबत राज्यमंत्रीमंडळात अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

अशोक चव्हाण
अशोक चव्हाण
author img

By

Published : Oct 6, 2020, 9:49 PM IST

मुंबई - केंद्राच्या कृषी कायद्यावर आज (दि. 6 ऑक्टो.) सह्याद्री अतिथीगृहात शेतकरी आणि त्यांच्या संघटनांच्या प्रतिनिधी सोबत बैठक झाली. मात्र, यावर कोणताही निर्णय झालेला नाही, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

सह्याद्री अतिथीगृहावर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. त्यासोबतच शेतकरी संघटनांचे नेते ही ऑनलाइन आणि बैठक हजर होते.

अशोक चव्हाण म्हणाले, शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. ज्या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. आधारभूत किंमतही शेतकऱ्यांना मिळणार नाही, यातून मोठे दलाल आणि व्यापाऱ्यांचा फायदा होणार आहे. बाजार समित्या अडचणीत येणार आहेत. शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे संरक्षण राहणार नाही, असेही चव्हाण म्हणाले.

केंद्राच्या कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांना आधारभूत किंमत मिळणार नाही त्यांचे संरक्षण राहणार नाही. हा विषय केवळ काँग्रेसच नाही. तर केंद्र सरकारमध्ये सामील झालेल्या अकाली दलसारख्या पक्षाचासुद्धा आहे. अशा प्रकारची तीव्र भावना तिथे सुद्धा आहे. कृषी विधेयकावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका ही सर्व स्तरावर चर्चा विनिमय करण्याची आहे आणि त्यानंतरच या केंद्राच्या कृषी विधेयकावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होईल, अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.

हेही वाचा - 'कृषी विधेयकाचे आंधळेपणाने स्वागत केले जाणार नाही'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.