ETV Bharat / state

'राज्याचे बरे वाईट झाले तर आनंद होणारा भाजप हा जगातील एकमेव विरोधी पक्ष' - आदित्य ठाकरे बातमी

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, की आम्ही जशी लोकांची कामे करत आहोत, त्याप्रमाणे तुम्हीही करा असेही त्यांनी यावेळी सांगितले. तर हे जगातील सर्वात मोठे पॅनडेमिक असून एका शहरापूरता मर्यादित नाहीये. विरोधी पक्षाने कन्स्ट्रकटीव्ह क्रिटीसीजम करावे, इतर राज्यात जाऊन तिकडचा वैद्यकीय प्रतिसाद बघावा, आम्ही कोणावरही दोष न देता काम करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सध्या लोकांना फिट ठेवण्यावर आमचा भर असून विरोधीपक्ष मात्र इथल्या डिझास्टर टुरिजममध्ये व्यस्त आहे.

minister aditya thackeray
'राज्याचे बरे वाईट झाले तर आनंद होणारा भाजप हा जगातील एकमेव विरोधी पक्ष'
author img

By

Published : Jul 12, 2020, 6:23 AM IST

Updated : Jul 12, 2020, 6:53 AM IST

ठाणे - विरोधी पक्ष हेल्थ आणि डिझास्टर टूरिजम करत आहे. तर आम्ही मात्र लोकांची मदत कशी करता येईल याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. राज्याचे बरे वाईट झाले तर आनंद होणारा हा जगातील एकमेव विरोधी पक्ष असल्याची टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली.

'राज्याचे बरे वाईट झाले तर आनंद होणारा भाजप हा जगातील एकमेव विरोधी पक्ष'

काही दिवसांपूर्वी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण डोंबिवलीतील तोकड्या आरोग्य यंत्रणेवर बोट ठेवत टीका केली होती. त्याला काल (शनिवार) मंत्री आदित्य ठाकरे प्रत्युत्तर दिले. ते जिल्ह्यातील महापालिका, पालिकाक्षेत्रातील कोरोना परिस्थितीचा आढावा बैठकीसाठी कल्याणात आले होते. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.

एमएमआर रिजनमधील कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी आणि मिरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील कोरोना परिस्थितीची आढावा बैठक आदित्य ठाकरे यांनी घेतली.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, की आम्ही जशी लोकांची कामे करत आहोत, त्याप्रमाणे तुम्हीही करा असेही त्यांनी यावेळी सांगितले. तर हे जगातील सर्वात मोठे पॅनडेमिक असून एका शहरापूरता मर्यादित नाहीये. विरोधी पक्षाने कन्स्ट्रकटीव्ह क्रिटीसीजम करावे, इतर राज्यात जाऊन तिकडचा वैद्यकीय प्रतिसाद बघावा, आम्ही कोणावरही दोष न देता काम करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सध्या लोकांना फिट ठेवण्यावर आमचा भर असून विरोधीपक्ष मात्र इथल्या डिझास्टर टुरिजममध्ये व्यस्त आहे.

मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कशाप्रकारे काम सुरू आहे, याचा उहापोह आम्ही या बैठकीत केला. लोकांना कोरोनाच्या प्रादुर्भावापासून मुक्त ठेवून फिट कसे ठेवता येईल याचे मुख्य आवाहन आहे. धारावीतील हाताबाहेर गेलेली कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजवणारे धारावी मॉडेलचे किरण दिघावकरही या बैठकीला उपस्थित होते. एमएमआर रिजनमध्ये वाढणाऱ्या कोरोनाला अटकाव करण्यासाठी प्रशासकीय प्रतिसाद आणि मेडिकल इमर्जन्सी हे दोन महत्वाचे घटक असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. तर याठिकाणी आम्ही जम्बो बेड्सची सुविधा, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, ऍम्ब्युलन्स आदींची सुविधा वाढवत आहोत. मुंबईप्रमाणे इकडेही अधिकाधिक लोकांपर्यंत कसे पोहोचता येईल याचाही विचार या बैठकीत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

“धारावीच्या धर्तीवर कल्याण डोंबिवलीमध्ये ‘चेस द व्हायरस’ मोहीम अधिक तीव्र करा”

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यासह कल्याण – डोंबिवली महापालिका परिक्षेत्रात कोविड १९ रुग्णांची वाढणारी संख्या आटोक्यात आणण्यासाठी धारावीच्या धर्तीवर ‘चेस द व्हायरस’ मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे. धारावीसारख्या गच्च वस्तीतही करोनाची साथ आटोक्यात आणणे शक्य झाले असून कल्याण-डोंबिवली परिक्षेत्रातही ही बाब अशक्य नाही. त्यासाठी ‘चेस द व्हायरस’ ही मोहीम अधिक तीव्र करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर अधिक भर द्या, टेस्टसची संख्या वाढवा; आकडे वाढलेले दिसले तरी घाबरून जाऊ नका, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

मुंबई आणि ठाण्याच्या धर्तीवर कल्याण – डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ, उल्हासनगर आदी ठिकाणीही जम्बो आरोग्य व्यवस्था उभारण्यात येत आहेत. एकही नागरिक उपचारांपासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रशासनाने दक्ष असले पाहिजे. मृत्यू दर कमी ठेवण्याला प्राधान्य असल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. या प्रसंगी मुंबई महापालिकेतील अधिकारी किरण दिघावकर यांनी धारावी पॅटर्नसंदर्भात तपशीलवार माहिती देऊन काही उपयुक्त सूचना केल्या.

एमएमआर रिजनमधील कोरोना परिस्थितीची आढावा बैठकीला कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर विनिता राणे, कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी, नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, भिवंडी महापालिका आयुक्त पंकज अशिया, उल्हासनगर महापालिका आयुक्त राजा दयानिधी आणि अंबरनाथ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.प्रशांत रसाळ आदी वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते

Last Updated : Jul 12, 2020, 6:53 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.