ETV Bharat / state

Aditya Thackeray on Balasaheb Thackeray : रिन्यूएबल एनर्जी तयार करणे हेच बाळासाहेबांना अभिवादन - मंत्री आदित्य ठाकरे

दिवंगत बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray Birth Anniversary ) आणि नेताजी सुभाषचंद्र बोस ( Subash Chandra Bose Birth Anniversary ) यांची जयंती आहे. हे दोन्ही महापुरुष रिन्यूएबल एनर्जी असलेले नेते होते. आज त्यांच्या जयंतीच्या दिवशी मध्य वैतरणा धरणांमधून १०० मेगावॅट वीज निर्मिती करण्याचा करार केला जात आहे. हेच या दोन्ही महापुरुषांना अभिवादन असल्याचे राज्याचे पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे ( Minister Aditya Thackeray on Balasaheb Thackeray ) यांनी म्हटले आहे.

author img

By

Published : Jan 23, 2022, 4:52 PM IST

Updated : Jan 23, 2022, 4:59 PM IST

Aditya Thackeray
आदित्य ठाकरे

मुंबई - दिवंगत बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray Birth Anniversary ) आणि नेताजी सुभाषचंद्र बोस ( Subash Chandra Bose Birth Anniversary ) यांची जयंती आहे. हे दोन्ही महापुरुष रिन्यूएबल एनर्जी असलेले नेते होते. आज त्यांच्या जयंतीच्या दिवशी मध्य वैतरणा धरणांमधून १०० मेगावॅट वीज निर्मिती करण्याचा करार केला जात आहे. हेच या दोन्ही महापुरुषांना अभिवादन असल्याचे राज्याचे पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे ( Minister Aditya Thackeray on Balasaheb Thackeray ) यांनी म्हटले आहे. येत्या २०२४पर्यंत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा धरणामधून मुंबईकरांना ही वीज दिली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा धरणामधून १०० मेगावॅट क्षमतेची संकरित अक्षय ऊर्जानिर्मिती करण्याचा करार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथी गृह येथे झाला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार होता. मात्र, ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एका मीटिंगमध्ये असल्याने ते कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित राहू शकले नाहीत.

मध्य वैतरणा धरणाचे उद्धव ठाकरे यांचे स्वप्न -

२००६-०७पासून धरणाचे काम सुरू झाले. याबाबत पालिकेत प्रदर्शन भरवले जाते. त्यातील फोटो पाहिले तर धरणाची उंची जशी वाढत गेली तशी माझीही उंची वाढत गेल्याचे दिसून येते. २००६-०७पासून नेमके नवीन काय करत आहेत. ते पाहण्यासाठी वडील उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेलो. २०१५-१६मध्ये या धरणाच्या उद्घाटनालाही गेलो. महाराष्ट्रातील सर्वात उंच धरणांमधील हे तिसरे धरण आहे. या धरणाचे काम झाल्यावर जगात सर्वात कमी वेळात धारण बांधण्यात पालिका ९व्या क्रमांकावर अशी ओळख होती. देशात आणि जगात स्वतःचे धारण असणारी एकमेव मुंबई महापालिका आहे. २०१७च्या वचननाम्यात या धरणावर स्वतःची हायड्रो इलेक्ट्रिसिटी यंत्रणा बसवण्याचे वचन दिले होते. ते आज पूर्ण झाले आहे.

हेही वाचा - Unveiling Statue of Maharana Pratap : महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज अनावरण

रिन्यूएबल एनर्जीचे काम पुढे नेत आहोत -

बेस्ट बसमध्ये नेहमी पुढे चला म्हटले जाते. मुंबई अशीच सतत पुढे जात आहे, काहीतरी वेगळे करत आहे. त्यासाठी फ्लोटिंग सोलार इलेकट्रीसिटी प्लांटचा प्लान केला. यामधून ८० मेगावॅट आणि हायडल मधून २० मेगावॅट, अशी एकूण १०० मेगावॅट इलेक्ट्रिसिटी मिळणार आहे. पुढच्या दोन वर्षात म्हणजे २०२४मध्ये ही इलेक्ट्रिसिटी मुंबईकरांना देऊ शकू. बाळासाहेब ठाकरे रिन्यूएबल एनर्जी असलले होते. धरणामधूनही रिन्यूएबल एनर्जी तयार करून त्यांचे काम पुढे नेत आहोत. हे काम पुढे नेत असताना आपण कार्बन न्यूट्रॅलिटीकडे पाऊल टाकत आहोत, हेदेखील महत्त्वाचे आहे. जागतिक पातळीवर काम करताना अशी कामे जी नागरिकांसाठी केली, याची दखल घेतली जाते. जून-जुलैमध्ये या कामाचे भूमिपूजन करून दिलेल्या कालावधीत हे काम पूर्ण करावे, अशा सूचना करत काही अडचणी आल्यास त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन आदित्य ठाकरे यांनी दिले.

भविष्याचा विचार करणारे ठाकरे घराणे -

आज हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. त्यांनी देशाला दिशा दिली. आजच्या दिवशी त्यांचे नाव दिलेल्या मध्य वैतरणा धरणामधून १०० मेगावॅट वीज निर्मिती बाबतचा करार होत आहे, हे त्यांना अभिवादन आहे. १०० मेगावॅट वीज निर्मिती करणारी मुंबई पालिका पालिका देशात पहिली आहे. याचे सर्व श्रेय दिवगंत बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांना जाते. बाळासाहेबांनी नेहमीच पुढचा विचार केला. त्यांनी २५ वर्षांनंतर असलेल्या तरुणांना आपण काय देऊ शकतो याचे स्वप्न पाहिले. ते स्वप्न आज मुख्यमंत्री म्हणून उधाण ठाकरे यांनी पूर्ण केले आहे. मुख्यमंत्र्यांवर जरी टीका होत असली तरी त्यांनी नेहमीच आपल्या कामातून उत्तर दिले आहे. यामुळेच ते ३ ते ४ वेळा देशातील टॉप पाच मुख्यमंत्र्यांमध्ये त्यांचा समावेश झाला. आज त्यांचे काम आदित्य ठाकरे पुढे नेत आहेत. बारीक लक्ष ठेवून काम करणारे ठाकरे घराणे आहे. ठाकरे घराणे नेहमीच भविष्याचा विचार करते. यामुळे चांगले आणि वाईट जे काही असेल, याला आम्ही सामोरे जाऊ, तुम्ही फक्त लढ म्हणा, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

Last Updated : Jan 23, 2022, 4:59 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.