ETV Bharat / state

BMC revenue loss : करपात्र मूल्यामधून भांडवली मूल्यांमध्ये रूपांतर; महापालिकेचा कोटयवधी रूपयांचा महसूल बुडवला - Mumbai Municipal Corporation was sunk

विभाग निरीक्षकाने मुंबई महानगरपालिकेचा एका मालमत्तेचे करपात्र मूल्यामधून भांडवली मूल्यांमध्ये रूपांतर करताना ( Conversion from taxable value to capital values ) कोटयावधी रूपयांचा महसूल बुडवला ( Mumbai Municipal Corporation loss ) असल्याची धक्कादायक माहिती समोर आहे. विभागातील अधिकाऱ्यांनी यामध्ये गैरव्यवहार करून महापालिकेचा कोटयावधी रूपयांचा महसूल बुडवल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ता संतोष पांडे ( BMC revenue loss ) यांनी केला होता.

BMC revenue loss
कोटयवधी रूपयांचा महसूल बुडवला
author img

By

Published : Dec 23, 2022, 1:07 PM IST

मुंबई : मुंबईतील माटुंगा येथील एका मालमत्ताचे करपात्र मूल्यामधून भांडवली मूल्यांमध्ये रूपांतर करताना ( Mumbai Municipal Corporation loss ) विभाग निरीक्षकाने मुंबई महानगरपालिकेचा कोटयावधी रूपयांचा महसूल बुडवला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महापालिकेच्या दक्षता विभागानेही ( Municipal Vigilance Department ) यासंदर्भातला ठपका ठेवणारा अहवाल दिला आहे. या अधिकाऱ्यांवर अदयाप का कारवाई झाली नाही त्यांची सखोल चौकशी करून का कारवाई केली जात नाही, त्यांना पालिकेच्या कोणत्या अधिकाऱ्यांचे अभय आहे, असा सवालही सतोष पांडे ( Social activist Santosh Pandey) यांनी उपस्थित केला आहे.

काय आहे प्रकरण : मुंबईतील माटुंगा येथील मार्गावरील प्लॉट क्रमांक 292 भानुज्योती बिल्डिींग या मालमत्तेचे करपात्र मूल्य ते भांडवली मूल्यांमध्ये रूपांतर करताना तत्कालीन विभाग निरीक्षकाने स्थळ निरीक्षणानुसार 12.50 चौरस मीटरची परिशिष्ट अ मध्ये नोंद केलेली आहे. केवळ पक्षकाराच्या विकासकामाच्या फायदयासाठी एफ/ उत्तर विभागातील करनिर्धारण आणि संकलन विभागाने अनधिकृत बांधकामाचे एकूण 72 चौरस मीटर क्षेत्रफळाचे कोणतेही कागदपत्र न पाहता तसेच महानगरपालिकेच्या इमारतीच्या अंतिम मंजूर आराखडयात क्षेत्रफळाबाबतची कोणतीही नोंद नसताना परिशिष्ट अ मध्ये नोंद केली आहे. या विभागातील अधिकाऱ्यांनी यामध्ये गैरव्यवहार करून महापालिकेचा कोटयावधी रूपयांचा महसूल बुडवल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ता संतोष पांडे यांनी केला होता.

दक्षता समितीचा अहवालातही ठपका : दरम्यान यासंदर्भात महापालिकेच्या दक्षता समितीने चौकशी केल्यानंतर आपला अहवाल देताना अत्यंत गंभीर स्वरूपाच्या बाबी नोंदवल्या आहेत. सदर मालमत्तेचे 2022 पूर्वी स्थानांतरण झालेले असून विभाग कार्यालयाने क्षेत्रफळामध्ये सुधारणा करण्यासाठी एकाच मालमत्तेचे दोन वेळा स्थानांतरण करून, चुकीचे मॉडेल वापरल्यामुळे तसेच मनपा अधिनियम 1888 कलम 525 चा वापर करून रिअसेसमेंट मॉडल मधून सुधरणा न केल्यामुळे महानगरपालिकेचे 14 लाख 73 हजार 991 रूपयांची घट झाल्याचे निदर्शनास आल्याचा ठपका या समितीने ठेवला आहे. तसेच या विषयांमध्ये मालमत्तेचे सन 2022 पूर्वी स्थानांतरण झाले असून सन 2012 पूर्वीचा कोणताही पुरावा नसल्यामुळे वाढीव क्षेत्रफळामध्ये बदल करण्याकरिता नियमानुसार करनिर्धारण करणे आवश्यक असल्याचेही अहवालात म्हटले आहे. अतिरिक्त 72 चौरस मीटर क्षेत्रफळाचे बाजार मूल्य सुमारे पाच कोटी रूपये इतके आहे.

अधिकाऱ्यांवर कारवाई करा : करनिर्धारक आणि संकलन विभागाचे सह आयुक्त सुनील धामणे यांचा हा अहवाल अत्यंत स्पष्ट आणि परखड असतानाही संबंधित अधिकाऱ्यांना मुंबई महानगरपालिका का अभय देत आहे. मुंबई महानगरपालिकेचे लाखो रूपयांचे झालेल्या नुकसानाचे हे प्रकरण प्रातिनिधिक मानले तर कितीतरी अनेक प्रकरणांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी गैरव्यवहार केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या अधिका-यांवर अदयाप का कारवाई झाली नाही त्यांची सखोल चौकशी करून का कारवाई केली जात नाही त्यांना पालिकेच्या कोणत्या अधिकाऱ्यांचे अभय आहे, असा सवालही सतोष पांडे यांनी उपस्थित केला आहे. महानगरपालिकेची प्रतिमा मलिन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ बडतर्फची कार्यवाही करणे काळाची अत्यंत गरज आहे, अशी विनंती मनपा अधिकाऱ्यांना पांडे यांनी केलेली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.