ETV Bharat / state

Milan Subway : २०२३ च्या पावसाळ्यात मिलन सबवे होणार पूरमुक्त - Milan subway will be flood free

मुंबईमध्ये पाऊस पडल्यावर काही क्षणात हिंदमाता, किंग सर्कल, सायन, मिलन सब वे ( Water accumulates in areas such as the Milan subway ) आदी भागात पाणी साचते. पाणी साचल्याने वाहतूक ठप्प ( Traffic stopped due to waterlogging ) होते. यावर उपाय म्हणून हिंदमाता येथे भूमिगत टाक्या बांधण्यात आल्या. यामुळे यंदा हिंदमाता येथे पाणी साचलेले नाही. अशाच प्रकारची टाकी मिलन सबवे जवळ लायन्स क्लब मैदानात बांधण्यात आली. मात्र त्या टाकीची क्षमता कमी पडल्याने पुन्हा नव्याने टाकीची क्षमता वाढवली जाणार आहे.

Milan Subway
मिलन सबवे
author img

By

Published : Oct 24, 2022, 7:07 PM IST

मुंबई - मुंबईमध्ये पाऊस पडल्यावर काही क्षणात हिंदमाता, किंग सर्कल, सायन, मिलन सब वे ( Water accumulates in areas such as the Milan subway ) आदी भागात पाणी साचते. पाणी साचल्याने वाहतूक ठप्प ( Traffic stopped due to waterlogging ) होते. यावर उपाय म्हणून हिंदमाता येथे भूमिगत टाक्या बांधण्यात आल्या. यामुळे यंदा हिंदमाता येथे पाणी साचलेले नाही. अशाच प्रकारची टाकी मिलन सबवे जवळ लायन्स क्लब मैदानात बांधण्यात आली. मात्र त्या टाकीची क्षमता कमी पडल्याने पुन्हा नव्याने टाकीची क्षमता वाढवली जाणार आहे. त्यासाठी पालिका ( Mumbai Municipal Corporation ) तब्बल १६ कोटी रुपये खर्च करणार आहे. यामुळे २०२३ मध्ये मिलन सबवे पूरमुक्त होईल असा दावा मुंबई महापालिकेकडून करण्यात आला आहे.

मिलन सबवे होणार पूर मुक्त

एक टाकी बांधूनही दिलासा नाहीच - मुंबईमधील हिंदमाता परिसराला पावसाळी पाण्यापासून दिलासा देण्यासाठी सेंट झेवियर्स मैदान आणि प्रमोद महाजन उद्यान येथे दोन भूमीगत टाक्या बांधण्यात आल्या आहेत. किंग सर्कल गांधी मार्केट येथे देखील याच स्वरुपाची उपाययोजना करण्यात आली आहे. जोरदार पावसामुळे साचलेल्या पाण्याचा उपसा करुन ते या जलाशयांमध्ये साठवले जाते. पाऊस कमी झाल्यावर हे पाणी पंपिंग स्टेशनच्या माध्यमातून समुद्रात सोडले जाते. अशाच प्रकारची उपाययोजना सांताक्रूझ मिलन सबवे येथे करण्यात आली. १५ क्यूबीक मीटर पाणी साठवू शकते अशी भूमिगत टाकी उभारण्यात आली. मात्र याठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने ही टाकी कमी पडू लागली. यंदाच्या पावसात काही वेळातच मिलन सबवे पाण्याने भरल्याने येथील वाहतूक बंद करावी लागली. यासाठी आता येथे आणखी एक पाण्याची टाकी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

२०२३ मध्ये मिलन सब वे पूर मुक्त - मिलन सबवे येथे १५ क्यूबीक मीटर पाणी साठवणूक क्षमता असलेली भूमिगत पाण्याची टाकी बांधण्यात आली. मात्र ही क्षमता कमी पडत असल्याने टाकीचा विस्तार केला जाणार आहे. यामुळे टाकीची क्षमता २८ हजार क्युबीक मीटर होईल. याआधी पालिकेला भूमिगत टाकी बांधण्यासाठी ३६ कोटी रुपये खर्च करावे लागले आहेत. आता टाकीची क्षमता वाढवण्यासाठी आणखी १५ कोटी ९६ लाख ५६ हजार ५०१ रुपये खर्च येणार आहे. यासाठी निविदा मागवण्यात आल्या असून एप्रिल २०२३ पर्यंत काम पूर्ण होईल. त्यामुळे २०२३ च्या पावसाळ्यात मिलन सब वे परिसर पूर मुक्त होईल आणि स्थानिकांना दिलासा मिळेल, असा विश्वास पर्जन्य वाहिनी प्रमुख अभियंता अशोक मिस्त्री यांनी व्यक्त केला.

असे होणार आहे टाकीचे काम - मिलन सबवे येथील पाण्याच्या टाकीची क्षमता सुमारे २ कोटी लीटर आहे. त्यासाठी ३ हजार घन मीटर प्रतितास क्षमतेचे एकूण दोन उदंचन पंप कार्यान्वित करण्यात येणार आहे. म्हणजेच प्रतितास ६ हजार घन मीटर या क्षमतेने पाण्याचा उपसा होऊ शकणार आहे. ८ एप्रिल २०२२ पासून या साठवण जलाशयाचे काम सुरु करण्यात आले आहे. ७० मीटर x ५५ मीटर आकाराच्या या जलाशयाची खोली सुमारे १०.५ मीटर आहे. एप्रिल २०२३ पर्यंत या साठवण जलाशयाचा उपयोग करता येईल.

८०० कोटी रुपये खर्च - मुंबईत ३८६ फ्लडिंग पाॅईट्स म्हणजेच पाणी साचणारी ठिकाणे होती. त्यापैकी यंदा २८२ फ्लडिंग पाॅईट्स कमी झाले आहेत. तर १०४ फ्लडिंग पाॅईट्स असून त्यापैकी ३० फ्लडिंग पाॅईट्स जवळ उपाययोजना करण्यात आल्या आहेत. उर्वरित ७१ ठिकाणी उपाययोजना करण्यात येत असून पुढील दोन वर्षांत ७१ फ्लडिंग पाॅईट्स पूरमुक्त होतील. फ्लडिंग स्पॉट पूर मुक्त करण्यासाठी ८०० कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.