मुंबई : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळची (MIDC) वेबसाईट हॅक करण्यात आली होती. शिवायी, खंडणीची मागणी करण्यात आल्याचेही बोलले जात होते. यासंदर्भात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. आता याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायदा 2008 कलम 43 (अ)(फ) 66 नुसार अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या दिवशी झाला होता सायबर हल्ला
21 मार्च 2021 रोजी पहाटे 2 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास अज्ञात सायबर हल्लेखोरांकडून एमआयडीसीच्या वेबसाईट व संगणकीय कार्यप्रणालीवर सायबर हल्ला करण्यात आला होता. यानंतर महामंडळाची संगणकीय प्रणाली पूर्णपणे बंद पडली होती. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मुख्यालयातील लोकल सर्व्हर सिस्टम आणि डेटा वेब सेवांवर याचा परिणाम झाला होता. राज्यातील प्रादेशिक कार्यालयामध्ये असलेल्या संगणक कार्यप्रणालीवर यामुळे बाधा पोहोचली होती. हल्लेखोरांनी केलेल्या ई-मेलमध्ये हल्ल्याची माहिती देण्यात आलेली होती. दरम्यान, या मेलमध्ये खंडणीच्या रक्कमेचा उल्लेख नसल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा - पोलिसांच्या डोळ्यासमोरच होतेय दारूची सर्रास विक्री; पडोली चौकात सुरू झाले 'बार अँड रेस्टॉरंट'
हेही वाचा - दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : शिवकुमारच्या विक्षिप्तपणाची कर्मचाऱ्यांना असे धास्ती