मुंबई : रिक्षा चालकासाठी रिक्षा ही रोजीरोटी असते. मात्र, हीच रिक्षा चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. 24 जानेवारीला तक्रारदार अजय कुमार अभिमन्यू यादव (वय 38) वर्ष यांनी त्यांची ऑटो रिक्षा एमएच 47 सी 3323 ही कॅन्सर हॉस्पिटल, दहिसर पश्चिम, मुंबई येथे पार्क केली होती. त्यानंतर ते जेवण करण्यासाठी गेले होते. तेव्हा कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांची ऑटो रिक्षा चोरी केली. याबाबत एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हा भारतीय दंड संविधान कलम 379 अन्वये नोंद करण्यात आला. या गुन्ह्याच्या तपासामध्ये गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुर्यकांत पवार व पथक यांनी सीसीटीव्हीटीची पाहणी केली. त्यांना चोरीची ऑटो रिक्षा ही वेस्टर्न एक्स्प्रेस मार्गे जोगेश्वरीच्या दिशेने जात असल्याचे दिसून आले.
सीसीटीव्ही फुटेज व मोबाईल तांत्रिक विश्लेषण : त्यानंतर चोरीस गेलेल्या रिक्षाबाबत कोणत्याही प्रकारे माहिती मिळूून आली नाही. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुुन्हे सचिन शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांनी पोलीस ठाणे हद्दीतील इतर ठिकाणी झालेल्या ऑटो रिक्षा चोरीमधील प्राप्त सीसीटीव्ही फुटेज व मोबाईल तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीत इसमांचा शोध घेतला असता. त्यात आरोपी इसम हे चारकोप परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले.
रिक्षाचालक बनून पाहणी : त्यावरून चारकोप येथील पुजा बिल्डिंंग आणि हिंदुुस्थान नाका येथील रिक्षा स्टॅन्डवर पोलीस पथकातील पोलीस शिपाई मोरे व पोलीस शिपाई सवळी यांनी रिक्षाचालक बनून सलग 3 दिवस पाहणी केली. तेव्हा त्यांना सीसीटीव्हीमध्ये दिसणारे आरोपीत इसम 21 फेब्रुवारीला दुपारी 12.00 वाजताच्या दरम्यान रिक्षा चोरी करण्याकरीता जात असताना पोलीस शिपाई सवळी यांच्या निदर्शनास दिसून आले. त्यावेेळी या आरोपींना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यास आणून त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी नवघर पोलीस ठाणे, भाईंदर, कांदिवली पोलीस ठाणे, जुहू पोलीस ठाणे तसेेच एमएचबी पोलीस ठाणे हद्दीतून ऑटो रिक्षा चोरी केल्याचे निष्पन्न झालेले आहे.
गुन्ह्यातील रिक्षा हस्तगत करण्यात आली : अब्दुल अजीज मोमीन (वय 35) वर्ष हा इस्लाम कंपाऊंड, एमजी रोड, कांदिवली पश्चिम येथे तर भूषण लिंगपल्ली उर्फ शैलेश लिंगमपल्ली (वय 46) हा आंबेडकर चाळ, रेणुका नगर, कांदिवली पश्चिम येथे राहतात. एमएचबी पोलिसांनी ह्यावर्षी भारतीय दंड संविधन्यवाद कलम 379,34 अन्वये दाखल झालेल्या गुन्ह्यात एक रिक्षा हस्तगत केली आहे. 2022 मध्ये भारतीय दंड संविधान कलम 379 34 अन्वये दाखल झालेल्या गुन्ह्यातील एक रिक्षा जप्त केली आहे. त्याचप्रमाणे जुहू पोलीस ठाण्यात गेल्यावर्षी दाखल गुन्ह्यातील रिक्षा हस्तगत करण्यात आली आहे. तसेच नवघर पोलीस ठाणे मीरा-भाईंदर येथे यंदा भारतीय दंड संविधान कलम 379 दाखल झालेल्या गुन्ह्याचा छडा देखील एमएचबी पोलिसांनी लावला आहे.
हेही वाचा : CM On Matoshree : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मातोश्रीबद्दल मोठे विधान म्हणाले...