ETV Bharat / state

मुंबईतील म्हाडाच्या लॉटरीसाठी आता दिवाळीचा मुहूर्त! घरांचा आकडा 4000 वर - मुंबईत परवडणारे घर

मुंबईत खागसी बिल्डरकडून घर घेणे सर्वसामान्यांना परवडत नाही, अशावेळी मुंबईत परवडणारे घर घेणे हे केवळ म्हाडाच्या माध्यमातूनच शक्य होते. त्यामुळे दरवर्षी म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरीची इच्छुकांना प्रतीक्षा असते. दरम्यान मागील 2007 पासून 2019 पर्यंत केवळ एक वर्षे वगळता सलग मुंबईतील घरांसाठी लॉटरी निघाली आहे. पण आता लॉटरीला पावणे दोन वर्षाचा ब्रेक लागला आहे.

author img

By

Published : Feb 12, 2021, 6:24 AM IST

मुंबई - शहर आणि मुंबई महानगर प्रदेशात परवडणाऱ्या दरात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी इच्छुकांचे डोळे म्हाडाच्या लॉटरीकडे लागले आहेत. त्यानुसार कोकण मंडळाने 7500 हजार घरांच्या लॉटरीची घोषणा करत मार्चमध्ये जाहिरात काढण्याचे जाहीर करत इच्छुकांना खुशखबर दिली आहे. पण त्याचवेळी मुंबईतील घरांच्या लॉटरीची मात्र प्रतीक्षा वाढली आहे. कारण मुंबईच्या लॉटरीच्या जाहिरातीसाठी जानेवारीचा मुहूर्त देण्यात आला होता. पण ही लॉटरी रखडली असून आता मुंबई मंडळाकडून लॉटरीसाठी दिवाळीचा मुहूर्त काढण्यात आला आहे. त्याचवेळी लॉटरीतील 2500 घरांचा आकडा वाढून तो 4000 वर नेण्यात आला आहे.

पावणे दोन वर्षे लॉटरीची प्रतीक्षा

मुंबई मंडळाच्या लॉटरीला सर्वात जास्त प्रतिसाद मिळतो. मुंबईत खागसी बिल्डरकडून घर घेणे सर्वसामान्यांना परवडत नाही, अशावेळी मुंबईत परवडणारे घर घेणे हे केवळ म्हाडाच्या माध्यमातूनच शक्य होते. त्यामुळे दरवर्षी म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरीची इच्छुकांना प्रतीक्षा असते. दरम्यान मागील 2007 पासून 2019 पर्यंत केवळ एक वर्षे वगळता सलग मुंबईतील घरांसाठी लॉटरी निघाली आहे. पण आता लॉटरीला पावणे दोन वर्षाचा ब्रेक लागला आहे. जून 2019 मध्ये मुंबईतील घरांसाठी लॉटरी निघाली होती. पण त्यानंतर 2020 मध्ये लॉटरी निघाली नाही.

डिसेंबरमध्ये लॉटरीची गृहनिर्माण मंत्र्यांनी केली होती घोषणा

दरवर्षी मुंबईतील घरांसाठी लॉटरी निघते. पण 2020 मध्ये लॉटरीच निघालेली नाही. मुळात मुंबई मंडळाकडे लॉटरीसाठी घरेच नाहीत. त्यामुळे लॉटरी निघालेली नाही. पण आता मात्र लॉटरी काढण्याचा निर्णय घेत घरांचा शोध मागील 3-4 महिन्यांपासून सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार गोरेगाव मधील 2500 घरांसाठी 2021 मध्ये लॉटरी निघेल, त्यासाठी जानेवारीत जाहिरात निघेल, अशी घोषणा दोन महिन्यांपूर्वी, डिसेंबर मध्ये गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. पण जानेवारी महिना उलटून गेला तरी लॉटरीची जाहिरात काही प्रसिद्ध झाली नसून लॉटरीची प्रतीक्षा सुरूच आहे. तर आता लॉटरी आणखी लांबवत थेट दिवाळीचा नवा मुहूर्त लॉटरीसाठी सांगण्यात येत आहे. मुंबई मंडळातील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.

गोरेगावमधील 3400 तर विखुरलेल्या 600 घरांचा लॉटरीत समावेश

गृहनिर्माण मंत्र्यांनी जानेवारीत गॊरेगावामधील 2500 घरांसाठी जाहिरात काढू असे जाहीर केले खरे. पण म्हाडाला हा आकडा आणखी वाढवायचा होता. त्यामुळे मुंबई मंडळाने घरांचा शोध सुरू केला. पण घरांचा शोध काही पूर्ण होताना दिसत नाही. गॊरेगाव पहाडी येथे 7500 घरे बांधण्यात येत आहेत. यातील 2500 घरे येत्या काही वर्षांत पूर्ण होणार आहेत. त्यामुळे ही घरे लॉटरीत समाविष्ट करण्याचा निर्णय मुंबई मंडळाने घेतला आहे. तर आता यापुढे जात गोरेगावातीलच आणखी 900 घरे लॉटरीत समाविष्ट करण्यात येणार आहेत. त्याचवेळी विखुरलेली 600 घरे मिळाली असून ही घरे ही लॉटरीत समाविष्ट करत एकूण 4000 घरांसाठी लॉटरी काढण्याचा निर्णय घेतला आहे, असे ही या अधिकाऱ्याने सांगितले आहे. मात्र त्याचवेळी लॉटरीसाठी येट दिवाळीची मुहूर्त सांगितला आहे. घरे आहेत तर मग दिवाळीपर्यंत लॉटरी का खेचली जात आहे? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर 2021 मध्ये लॉटरी निघेल का, दिवाळीत तरी लॉटरीचा बार उडेल का हेच पाहणे महत्वाचे ठरेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.