ETV Bharat / state

Mhada Lottery Mumbai 2023: मुंबईत आज 4830 घरांसाठी म्हाडाची सोडत जाहीर ; त्वरित म्हाडाचा अर्ज भरा - म्हाडा लॉटरीसाठी कागदपत्रांची यादी

म्हाडाच्या ४ हजार ८३ घरांच्या विक्रीसाठी सोडत आज जाहीर करण्यात येणार आहे. आज दुपारी ३ वाजल्यापासून अर्ज नोंदणी, भरणा आणि स्वीकृतीला सुरुवात होणार आहे. १८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा नाट्यगृहात काढण्यात येणार आहे.

Mhada Lottery Mumbai 2023
म्हाडा लॉटरी मुंबई 2023
author img

By

Published : May 22, 2023, 1:28 PM IST

मुंबई : मुंबईत स्वत:चे हक्काचे घर असावे, असे मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यासाठी सर्वजण प्रयत्न करत असतो. आता ते स्वप्न पूर्ण होण्याची वेळ आली आहे. मुंबईतील ४०८६ कुटुंबांचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. तब्बल चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आजपासून म्हाडाच्या सोडतीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे. म्हाडाने मुंबईत ४०८६ घरे पूर्ण केली आहेत. म्हाडाची लॉटरी १८ जुलै रोजी काढण्यात येणार आहे.

गोरेगावात सर्वाधिक घरे : अत्यल्प उत्पन्न गटात पहाडी गोरेगाव पश्चिम येथील प्रधानमंत्री आवास योजनेतील १९४७, ॲन्टॉप हिलमधील ४१७ तर विक्रोळीच्या कन्नमवार नगरमधील ४२४ असे एकूण २,७८८ घरे समाविष्ट आहेत. अल्प उत्पन्न गटात एकूण १०३४ घरे आहेत. गोरेगावमधील पहाडी परिसरातील ७३६ घरांचा त्यात समावेश आहे. मध्यम उत्पन्न गटासाठी मंडळाने १४० घरे आहेत. ही घरे उन्नतनगर गोरेगाव पश्चिम, महावीर नगर कांदिवली, जुहू, अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व, सहकारनगर चेंबूर, लोकमान्यनगर दादर, ॲन्टॉप हिल वडाळा, भायखळा, टिळकनगर चेंबूर, चांदिवली पवई, गायकवाडनगर मालाड, प्रतीक्षानगर सायन, चारकोप कांदिवली येथे आहेत. उच्च उत्पन्न गटासाठी १२० घरांचा समावेश आहे. ही घरे जुहू अंधेरी पश्चिम, वडाळा पश्चिम, ताडदेव, लोअर परळ, शिंपोली कांदिवली, तुंगा पवई, चारकोप कांदिवली, सायन पूर्व येथे आहेत.

म्हाडा लॉटरीसाठी कागदपत्रांची यादी : आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र, महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र, पात्र ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, बँक खाते तपशील, पासपोर्ट, शाळा सोडल्याचा दाखला, मतदार ओळखपत्र हे म्हाडा लॉटरीसाठी आवश्यक कागदपत्र आहेत. म्हाडाच्या सुधारित संगणकीकृत लॉटरी प्रणालीद्वारे ही सोडत काढली जाईल, जी प्रक्रियेत पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी नवीनतम तंत्रज्ञानाचा वापर करते. नोंदणी, कागदपत्रे सादर करणे, पात्रता, ऑनलाइन लॉटरी वितरण आणि फ्लॅटसाठी पैसे भरण्यापासून संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पूर्ण केली जाईल. म्हाडाने इच्छूक खरेदीदारांनी फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा :

Governor Ramesh Bais : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कवितांचा अभ्यासक्रमात समावेश करावा; राज्यपाल रमेश बैस

G20 Srinagar summit : G20 बैठकीसाठी मोठ्या संख्येने येणार प्रतिनिधी, 'ही' आहेत उद्दिष्टे

PM Modi Meets The Governor General : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली पापुआ न्यू गिनीच्या गव्हर्नर जनरलची भेट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.