ETV Bharat / state

MHADA lottery 2023 : मुंबईतील घराची प्रतीक्षा संपली! 'या' दिवशी 4082 सदनिकांच्या विक्रीकरिता म्हाडाची निघणार सोडत - MHADA lottery 2023

मुंबईमध्ये घर खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. 14 ऑगस्ट रोजी म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 4082 घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी ही घोषणा केली आहे.

atul save
म्हाडा लॉटरी, अतुल सावे
author img

By

Published : Aug 10, 2023, 7:34 AM IST

Updated : Aug 10, 2023, 1:06 PM IST

मुंबई : म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबईतील विविध गृहनिर्माण योजनांतर्गत अंधेरी, जुहु, गोरेगांव, कांदिवली, बोरीवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव, सायन येथील 4,082 सदनिकांची विक्री करण्यात येणार आहे. या सदनिकांच्या विक्रीकरिता 14 ऑगस्टला संगणकीय सोडत काढण्यात येणार, अशी माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिली.

गृहनिर्माण मंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अतुल सावे यांनी पहिल्यांदाच म्हाडा कार्यालयास भेट दिली. म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात गृहनिर्माण मंत्री सावे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक बुधवारी पार पडली. मंत्री सावे यांनी म्हाडाच्या कामकाजाचा, प्रकल्पांचा आढावा घेतला. यामध्ये गिरणी कामगारांच्या घरांच्या सोडतीचे नियोजन, बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प, कामाठीपुरा पुनर्विकास प्रकल्प यांचा समावेश आहे.

गृहनिर्माण मंत्री अतुल सावे म्हणाले : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरी संदर्भात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. 1,20,144 पात्र अर्जांची संगणकीय सोडत काढली जाणार आहे. 14 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता मुंबई मंडळाच्या सदनिका सोडतीचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते होणार आहे. या कार्यक्रमास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित राहणार आहेत. गृहनिर्मिती क्षेत्रातील वाढत्या मागणीची पूर्तता करणे अवघड असले, तरी अशक्य नाही. पुनर्विकास प्रकल्पांच्या माध्यमातून अधिकाधिक घरांची निर्मिती होऊ शकते. याकरिता पुनर्विकास प्रकल्पांचे प्रश्न सोडविण्यासाठी कायदे व नियमावलीमध्ये बदल करण्यासंदर्भात शासनातर्फे विशेष प्रयत्न केले जाणार असल्याच सावे म्हणाले.

'इतके' अर्ज प्राप्त झाले : मुंबई मंडळ प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) भागासाठी 1,947 सदनिका समाविष्ट आहे. पहाडी गोरेगाव येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरांसाठी 22,472 अर्ज आले आहेत. तसेच उत्पन्न गटनिहाय अत्यल्प उत्पन्न गटातील 843 सदनिकांसाठी 28,862 अर्ज प्राप्त झाले आहेत. या उत्पन्न गटातील सर्वाधिक अर्ज कन्नमवार नगर विक्रोळी (415) या योजनेकरिता प्राप्त झाले आहेत. तसेच अल्प उत्पन्न गटातील 1034 सदनिकांसाठी 60,522 अर्ज प्राप्त झाले आहेत. सर्वाधिक अर्ज पहाडी गोरेगांव (416) या योजनेकरिता आहेत, तर मध्यम उत्पन्न गटातील 138 सदनिकांसाठी 8395 अर्ज प्राप्त झाले आहेत.

हेही वाचा :

  1. MHADA Lottery 2023: मुंबईत घर घेण्याची संधी... म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे ४,०१७ घरांच्या लॉटरीचा ऑगस्टमध्ये होणार श्रीगणेशा
  2. MHADA Software : म्हाडाच्या सॉफ्टवेअरमधील त्रुटींमुळे नागरिक संतप्त, आंदोलन करण्याचा सरकारला इशारा
  3. MHADA Flat Lottery In Pune: म्हाडाकडून एकूण 6058 सदनिकांची ऑनलाईन सोडत; अनेकांना लागली घरांची लॉटरी
Last Updated : Aug 10, 2023, 1:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.