ETV Bharat / state

कोरोना नियंत्रणासाठी राज्य सरकारची नवी रणनीती, त्रीस्तरीय केंद्रांतून होणार उपचार - कोरोना उपचार केंद्र

केंद्र सरकारच्या सूचनांनुसार कोरोनावरील उपचारासाठी तीन श्रेणींमध्ये रुग्णालयांची वर्गवारी केली आहे. श्रेणी- १ मध्ये अधिकृत कोविड रुग्णालय, श्रेणी- २ मध्ये अधिकृत कोविड रुग्णालये आणि निगा केंद्र तर श्रेणी ३ मध्ये कोविड रुग्ण निगा केंद्र यांचा समावेश होतो. या तिन्ही श्रेणीतील उपचार केंद्रामध्ये तापाचे रुग्ण तपासण्यासाठी फिवर क्लिनिक सुरू करण्यात आले आहेत. कोरोनाबाधित गंभीर रुग्णांसांठी श्रेणी १ मध्ये उपचार सुविधा उपलब्ध आहे. तर सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी श्रेणी २ मध्ये, तर ज्यांना लक्षणे नाहीत अशांसाठी श्रेणी ३ मध्ये उपचार केला जातो, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

राजेश टोपे -आरोग्यमंत्री
राजेश टोपे -आरोग्यमंत्री
author img

By

Published : Apr 27, 2020, 8:14 PM IST

मुंबई - दिवसेंदिवस राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना कोरोनासाठी त्रिस्तरीय उपचार आणि निगा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. सध्या तीन वर्गवारीतील १६७७ उपचार केंद्र असून त्यामध्ये १ लाख ७६ हजार ३४७ विलगीकरण (आयसोलेशन) खाटांची संख्या आहे. तर ७ हजार २४८ अतिदक्षता (आयसीयू) खाटांची उपलब्धता आहे. राज्यात सुमारे तीन हजार व्हेंटीलेटर्स उपलब्ध आहेत. तर ८० हजाराच्या आसपास पीपीई किटस तर २ लाख ८२ हजार एन ९५ मास्क उपलब्ध आहेत, अशा प्रकारे कोरोना विरोधात उपचार करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज मुंबईत दिली.

टोपे म्हणाले, केंद्र शासनाच्या सूचनांनुसार कोरोनावरील उपचारासाठी तीन श्रेणींमध्ये रुग्णालयांची वर्गवारी केली आहे. श्रेणी- १ मध्ये अधिकृत कोविड रुग्णालय, श्रेणी- २ मध्ये अधिकृत कोविड रुग्णालये आणि निगा केंद्र तर श्रेणी ३ मध्ये कोविड रुग्ण निगा केंद्र यांचा समावेश होतो. या तिन्ही श्रेणीतील उपचार केंद्रामध्ये तापाचे रुग्ण तपासण्यासाठी फिवर क्लिनिक सुरू करण्यात आले आहेत. कोरोनाबाधित गंभीर रुग्णांसांठी श्रेणी १ मध्ये उपचार सुविधा उपलब्ध आहे. तर सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी श्रेणी २ मध्ये, तर ज्यांना लक्षणे नाहीत अशांसाठी श्रेणी ३ मध्ये उपचार केला जातो, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

राज्यात श्रेणी १ ची २४६ अधिकृत कोरोना रुग्णालये असून त्यामध्ये एकूण ३२ हजार ८६१ विलगीकरण खाटा आहेत. त्यात अतिदक्षता विभागातील खाटांचाही समावेश आहे. श्रेणी २ मधील ५१७ अधिकृत कोरोना रुग्णालयं आणि निगा केंद्र कार्यरत असून त्यामध्ये अतिदक्षता विभागातील खाटा मिळून सुमारे ३१ हजार विलगीकरण खाटा उपलब्ध आहेत. श्रेणी ३ मधील ९१४ कोरोना रुग्ण निगा केंद्र कार्यरत आहेत. त्यात १ लाख २० हजार ६११ विलगीकरण खाटा आहेत,

राज्यात अशा प्रकारे एकूण १६७७ रुग्णालये तीनही श्रेणीतील असून त्यात १ लाख ७६ हजार ३४७ विलगीकरण (आयसोलेशन) खाटा आहेत. त्यामध्ये कोरोना संशयित रुग्णांसाठी ६२ हजार ६४० तर कोरोनाबाधीतांसाठी १ लाख १३ हजार ७०७ विलगीकरण खाटांचा समावेश आहे. या तिन्ही श्रेणीतील रुग्णालयांसाठी खाटांची, पीपीई, किटस् तसेच व्हेंटीलेटर्सची संख्या पुरेशी आहे, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.