ETV Bharat / state

DRI Seizes Foreign Cigarettes : डीआरआयने 24 कोटी रुपयांच्या विदेशी सिगारेट केल्या जप्त, 5 जणांना अटक - 5 जणांना अटक

महसूल गुप्तचर संचालनालय, मुंबईने 24 कोटी रुपयांच्या विदेशी 1.2 कोटी सिगारेट जप्त केल्या आहेत. त्यांची तस्करी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका आयातदारासह पाच जणांना अटक केली आहे. या सिगारेट्स भारतीय मानकांचे पालन न केल्यामुळे भारतात आयात करण्यास बंदी घालण्यात आली आहे, डीआरआयने रविवारी एका प्रकाशनात म्हटले आहे.

MH DRI Seizes Foreign Cigarettes
डीआरआयने 24 कोटी रुपयांच्या विदेशी सिगारेट केल्या जप्त
author img

By

Published : May 14, 2023, 2:52 PM IST

मुंबई : विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, एका कंटेनरमधून प्रतिबंधित पदार्थ जप्त करण्यात आले होते, जे पुढील मंजुरीसाठी अर्शिया फ्री ट्रेड वेअरहाऊसिंग झोन (FTWZ) मध्ये पाठवले जाणार होते. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी कंटेनरच्या हालचालीवर कडक नजर ठेवली.

डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी गोदामात कंटेनर अडवला : नवी मुंबईतील न्हावा शेवा बंदरातून कंटेनर निघाल्यानंतर, त्याच्या इच्छित स्थळी पोहोचण्याऐवजी, तो अर्शिया एफटीडब्ल्यूझेडकडे जात असताना एका खासगी गोडाऊनमध्ये वळवण्यात आल्याचे आढळून आले. त्यानंतर डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी गोदामात कंटेनर अडवला, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. संपूर्ण 40 फूट कंटेनर विदेशी मूळ सिगारेटने भरलेले आढळले होते. भारतीय मानकांचे पालन करत नसल्यामुळे भारतात आयात करण्यास बंदी घालण्यात आली आहे, असे एका प्रकाशनात म्हटले आहे.

1.07 कोटी सिगारेट जप्त करण्यात आल्या : कस्टम अधिकार्‍यांना फसवण्यासाठी सिगारेट कंटेनरमधून काढून त्याऐवजी आयात दस्तऐवजांमध्ये घोषित केलेल्या वस्तूंसह सिगारेटची तस्करी करण्याची योजना सिंडिकेटने आखली होती, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. कंटेनर अर्शिया एफटीझेडमध्ये नेण्यापूर्वी गोदामामध्ये आधीच घोषित मालाचा साठा होता, जो सिगारेट काढून टाकल्यानंतर कंटेनरमध्ये भरायचा होता. कंटेनरमधून विविध ब्रँडच्या विदेशी मूळच्या एकूण 1.07 कोटी सिगारेट जप्त करण्यात आल्याचे डीआरआयने सांगितले. त्यांची तस्करी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका आयातदारासह पाच जणांना अटक केली आहे. त्याच सिंडिकेटने यापूर्वी तस्करी केलेल्या विदेशी मूळच्या 13 लाख सिगारेट आणखी एक गोदामातून जप्त करण्यात आल्या आहे, असे प्रकाशनात म्हटले आहे.

1. हेही वाचा : Karnataka Assembly election 2023 : कर्नाटकमधील निवडणुकीच्या विजयानंतर काँग्रेसचे राज्यसभा निवडणुकीतही होणार पारडे जड

2. हेही वाचा : Bodybuilding Competition : टॅक्सीचालकाच्या मुलीने बॉडीबिल्डिंग स्पर्धेत पटकावला क्रमांक, ऑलिंपिकमध्ये भारताचे राष्ट्रगीत गाण्याचे स्वप्न

3. हेही वाचा : Eknath Shinde Criticized Uddhav Thackeray: 'बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना', स्वत:च्या जळत्या घराकडे लक्ष द्या- मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.