ETV Bharat / state

मेट्रोसह एमएमआरडीएच्या प्रकल्पांना मजूर कमतरतेचा फटका नाही

प्रत्येक प्रकल्पात फिजिकल डिस्टन्सिंग पाळत काम सुरू आहे. लॉकडाऊनमुळे रहदारी कमी असल्याने उलट मेट्रोची कामे जोरात सुरू आहेत. त्यामुळे सर्व प्रकल्प निश्चित वेळेत पूर्ण होतील, असा दावा एमएमआरडीएकडून केला जात आहे.

मेट्रोसह एमएमआरडीएच्या प्रकल्पांना मजूर कमतरतेचा फटका नाही
मेट्रोसह एमएमआरडीएच्या प्रकल्पांना मजूर कमतरतेचा फटका नाही
author img

By

Published : May 14, 2020, 7:14 PM IST

मुंबई - कोरोना आणि लॉकडाऊनमुळे हवालदिल झालेला मुंबईतील मजूर गावी परतला आहे. यात पायाभूत सुविधा प्रकल्पात काम करणाऱ्या मजुरांचाही समावेश आहे. त्यामुळे मुंबईतील मेट्रोसह इतर महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पण मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशात मेट्रो आणि इतर प्रकल्प राबवणाऱ्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मात्र ही शक्यता नाकारत आपल्या कुठल्याही प्रकल्पाला फटका बसणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

मेट्रोसह एमएमआरडीएच्या प्रकल्पांना मजूर कमतरतेचा फटका नाही
मेट्रोसह एमएमआरडीएच्या प्रकल्पांना मजूर कमतरतेचा फटका नाही

मेट्रो 2, मेट्रो 2 ब, मेट्रो 4, मेट्रो 6 सह अन्य मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू (एमटीएचएल), उन्नतरोड प्रकल्पासह मॉन्सूनपूर्व कामे ही सुरू आहेत. सध्या मेट्रो आणि मॉन्सून पूर्व कामाला एमएमआरडीएने प्राधान्य दिले आहे. त्यामुळे सध्या मेट्रो आणि मॉन्सून पूर्व कामाला वेग देण्यात आला आहे.

दरम्यान, एमएमआरडीएने लॉकडाऊन झाल्याबरोबर 17000 हून अधिक मजुरांच्या निवारा तसेच जेवणाची व्यवस्था केली होती. तर त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेतली जात होती. त्यामुळे हे मजूर कुठेही परतले नसून ते प्रकल्पात काम करत आहेत. त्यामुळे आमच्याकडे आजच्या घडीला पुरेसा मजूर वर्ग आहे. तेव्हा कुठेही एमएमआरडीएच्या प्रकल्पाला फटका बसणार नाही की प्रकल्प रखडणार नाही, अशी माहिती डॉ. बी. जी. पवार यांनी दिली आहे. प्रत्येक प्रकल्पात फिजिकल डिस्टन्सिंग पाळत काम सुरू आहे. लॉकडाऊनमुळे रहदारी कमी असल्याने उलट मेट्रोची कामे जोरात सुरू आहेत. त्यामुळे सर्व प्रकल्प निश्चित वेळेत पूर्ण होतील, असा दावा एमएमआरडीएकडून केला जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.