ETV Bharat / state

राज्यातील 'या' भागांत मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

राज्यात सर्वत्र पाऊस सुरू असला तरी पावसाचे मुख्य क्षेत्र कोकण, गोवाच असणार आहे. 20 जूनपर्यंत कोकण, गोव्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचसोबत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ येथेही पाऊस पडण्याची शक्यता आहे. याबद्दल मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे उपसंचालक के. एस. होसाळीकर यांनी ट्विट केले आहे.

forecast torrential rain in Maharashtra
राज्यातील 'या' भागांत मुसळधार पावसाची शक्यता
author img

By

Published : Jun 16, 2020, 8:39 PM IST

मुंबई - राज्यात सर्वत्र पाऊस सुरू असला तरी पावसाचे मुख्य क्षेत्र कोकण, गोवाच असणार आहे. 20 जूनपर्यंत कोकण, गोव्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचसोबत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ येथेही पाऊस पडण्याची शक्यता आहे. उपग्रह आणि रडारने पाठविलेल्या चित्रांनुसार राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा येथे ढगाळ वातावरण आहे. याबद्दल मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे उपसंचालक के. एस. होसाळीकर यांनी ट्विट केले आहे.

नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल पश्चिम मध्य प्रदेशाच्या आणखी काही भागात, पूर्व मध्य प्रदेशच्या बहुतांश भागात, पूर्व उत्तर प्रदेशच्या आणखी काही भागात झाली आहे, असे वृत्त हवामान विभागाने दिले आहे.

गेल्या २४ तासांतील पर्जन्यमान :

कोकण गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण गोवा, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला.
राज्याच्या संपूर्ण भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.

गेल्या चोवीस तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमीमध्ये) :

कोकण आणि गोवा: मंडणगड, राजापूर १६ प्रत्येकी, मारमागोवा १५, सावंतवाडी १३. दाभोलीम (गोवा) , दापोली १२ प्रत्येकी, लांजा, पेडणे, संगमेश्वर देवरुख प्रत्येकी ११, मडगाव १०, चिपळूण, रामेश्वर(कृषी) 9, गुहागर, खेड ८
प्रत्येकी, कानकोना, कणकवली. मालवण, केपे, श्रीवर्धन, वैभववाडी, वेंगुर्ला - प्रत्येकी ७, म्हापसा ६, दोडामार्ग, खालापूर. कुडाळ, माथेरान, मुंबई (कुलाबा), वाल्पोई ५ प्रत्येकी, कर्जत, म्हसळा, मोखेशा ४ प्रत्येकी, देवगड,
माणगांव, मुरबाड, पोलादपूर, रोहा, उल्हासनगर ३ प्रत्येकी, हर्णे, पेण, रत्नागिरी २ प्रत्येकी, अंबरनाथ, भिवंडी, जव्हार, महाड, सुधागड पाली, ठाणे १ प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्रः गगनबावडा, गहरी १९ प्रत्येकी, येवला ८, लोणावळा (कृषी), राधानगरी प्रत्येकी ७, महाबळेश्वर ६, रावेर ५, चंदगड, रावेर, मुक्ताईनगर, ओझरखेडा, पन्हाळा, शेगाव ४

मराठवाडा: पाथरी ८, भोकरदन ७, जाफराबाद 6 , गंगापूर, माजल गाव, पैठण ५. आंबेजोगाई, फुलंनी, उमारी ४ प्रत्येकी , अर्धापूर, लातूर, पालम, परभणी, पूर्णा ३ प्रत्येकी

विदर्भः पाजी १३. लाखजी ७. देसाईगंज ६, आरमोरी, भंडारा, भिवापूर ५ प्रत्येकी, अहीरी, आमगाव, अर्जुनी मोरगाव, आप्णी, आभुळगाव, बाटकुली, चिखलदरा, चिखली, दारव्हा, देऊळगाव राजा, धानोरा, धारणी, दिग्रस, हिंगणघाट, खामगाव, कुरखेडा, लाखंदूर, लोणार, मालेगाव, मंगलूरपीर, मोर्शी, मोताळा, नागपूर, पंढरीकावडा, परतवाडा, रामटेक, समुद्रपूर, सोली, तेल्हारा, तुमसर, उमरेड, वणी, बाशिम २ प्रत्येकी,

पुढील हवामानाचा अंदाज:

१७ जूनः कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
१८ जून: कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
१९ जूनः कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
२० जून: कोंकण गोव्यात बहुतांश ठिकाणी. मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

इशारा :

१७ जून : कोकण गोव्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. कोकण - गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात
तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा होण्याची शक्यता. गोवा - महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता
१८ जून : कोंकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.
१९ - २० जून : कोंकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.
१७ आणि १८ जूनला मुंबईत आकाश सामान्यतः ढगाळ राहून मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबई : तापमान
मुंबई (कुलाबा) कमाल तापमान (३२.४) किमान (२५.६ )
मुंबई (सांताक्रूझ) कमाल तापमान (३३.७ )किमान (२६.४)

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.