ETV Bharat / state

हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट; मुंबईची झाली तुंबई, बीएमसीचे दावे गेले 'वाहून' - मुंबई पाऊस अपडेट

त्या 24 तासात अतिवृष्टी होईल, असा इशारा काल हवामान खात्याने दिला होता. त्यानुसार मुंबईत आज सायंकाळनंतर जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे दादर, हिंदमाता, माटुंगा किंगसर्कलसह अनेक सखल भागात पाणी साचले. पाणी साचलेल्या ठिकाणची वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली आहे.

Rain
पाऊस
author img

By

Published : Jul 14, 2020, 7:13 PM IST

मुंबई - कोरोना संकटाचा सामना करणाऱ्या मुंबई समोर आता पावसाचे आणखी एक संकट उभे राहिले आहे. काल मुंबईत जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यावेळीच येत्या 24 तासात अतिवृष्टी होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला होता. त्यानुसार मुंबईत आज सायंकाळनंतर जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे दादर, हिंदमाता, माटुंगा किंगसर्कलसह अनेक सखल भागात पाणी साचले. पाणी साचलेल्या ठिकाणची वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली आहे. हवामान खात्याने आज पुन्हा पुढील 24 तासात अतिवृष्टीचा इशारा दिला असून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

आज झालेल्या पावसाने सखल भागात साचले पाणी

आज मुंबईत अतिवृष्टी होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला होता. त्यानुसार दुपारपर्यंत मुंबईत काही ठिकाणी अधून-मधून हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत होता. मात्र, सायंकाळनंतर पावसाने जोर पकडल्याने दादर हिंदमाता, माटुंगा येथील किंग सर्कल भागात पाणी साचले. त्यामुळे कामावरून घरी जाणाऱया चाकरमान्यांना पाण्यातून कसरत करावी लागली.

दरम्यान, दक्षिण पाकिस्तान आणि त्याला लागून असलेल्या ईशान्य अरबी समुद्रावर कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव कायम आहे. महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीपासून ते केरळ किनारपट्टीपर्यत एक ट्रफ(द्रोणी सारखा भाग) बनला आहे. या स्थितीमुळे मुंबई आणि उपनगरात 17 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

महानगरपालिकेचा दावा फोल -

हिंदमाता येथे पाणी साचलेल्या ठिकाणी पोलीस नागरिकांना आणि पाण्यात आडकेल्या वाहनांना मार्ग काढून देत होते. हिंदमाता येथे पाणी तुंबू नये म्हणून पालिकेने पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता दुप्पट केली आहे. यामुळे पाणी साचणार नाही, पाण्याचा निचरा लवकर होईल, असा पालिकेने दावा केला होता. पालिकेचा हा दावा आजच्या पावसात वाहून गेला आहे.

या ठिकाणी साचले पाणी -

हिंदमाता, शक्कर पंचायत रोड वडाळा, धारावी क्रॉस रोड, सरदार हॉटेल काळाचौकी, एसआयइएस कॉलेज माटुंगा, भायखळा पोलीस ठाणे, चेंबूर ब्रिज, चेंबूर रेल्वे स्टेशन, अंधेरी सबवे या ठिकाणी आजच्या मुसळधार पावसाने रस्त्यांना नद्यांचे स्वरूप प्राप्त झाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.