ETV Bharat / state

केईएममधून रुग्ण बेपत्ता झाल्याने खळबळ

शहरातील केईएम रुग्णालयातून मानसिकरित्या आजारी असलेला रुग्ण बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. यापूर्वीही रुग्णालयातून रुग्ण परागंदा झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. या प्रकारामुळे केईएम रुग्णालयातील रुग्णांच्या सुरक्षितेसंदर्भात प्रश्न उपस्थित केला जात आहे.

केईएम रुग्णालय
केईएम रुग्णालय
author img

By

Published : Jun 4, 2020, 2:57 PM IST

निलेश गुप्ता
निलेश गुप्ता

मुंबई - शहरातील केईएम रुग्णालयातून मानसिकरित्या आजारी असलेला रुग्ण बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. वरळी भागात राहणारा 17 वर्षीय रुग्ण निलेश गुप्ता रुग्णालयातुन 2 मेपासून बेपत्ता आहे. निलेश गुप्ता हा वरळी नाका येथील रहिवासी आहे.

निलेश गुप्ता मानसिकरित्या आजारी आहे. त्याच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरु होते. 2 मेला निलेश शौचालयास गेला होता. बराच काळ गेल्यानंतर तो परत न आल्याने उपस्थितांनी त्याचा शोध घेतला. मात्र, तो सापडला आला नाही. अखेर निलेशच्या पालकांनी 11 मे ला भोईवाडा पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. गेल्या एका महिन्यात काही लोकांनी निलेशला दोनदा केईएम हॉस्पिटलमध्ये आणि दादरमध्ये पाहिल्याची माहिती दिली होती

दरम्यान या घटनेमुळे आरोग्य सेवा देणाऱ्या रुग्णालयांचा गलथान कारभार परत एकदा समोर आला आहे. यापूर्वी रुग्णालयातून रुग्ण परागंदा झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. या प्रकारामुळे केईएम रुग्णालयातील रुग्णांच्या सुरक्षितेसंदर्भात प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.