ETV Bharat / state

मानखुर्दच्या 'चिल्ड्रन्स होम सोसायटी'तील गतीमंद मुलांनी केली कोरोनावर मात - मानखुर्द चिल्ड्रन्स होम सोसायटी कोरोना

जुलै महिन्यात 'चिल्ड्रन्स होम सोसायटी' व्यवस्थापनाने मुंबई महानगरपालिकेशी संबंध साधून काही मुलांना खोकला असल्याची माहिती दिली होती. यानंतर मुंबई महानगरपालिकेच्यावतीने याठिकाणी फिव्हर कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पमध्ये एकूण 268 मुलांची स्क्रिनिंग करण्यात आली. त्यातील 25 मुलांना कोरोनाची लागण झाली होती.

Children's Home
चिल्ड्रन्स होम
author img

By

Published : Aug 5, 2020, 7:24 PM IST

मुंबई - मानखुर्द येथील चिल्ड्रन्स होम सोसायटीतील कोरोनाबाधित गतिमंद मुलांनी कोरोनावर मात केली. वांद्रे-कुर्ला संकुलातील कोविड सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले. खासदार राहुल शेवाळे यांनी कोविड सेंटरमध्ये जाऊन या मुलांची भेट घेतली. शेवाळे यांनी मुलांना पुष्गुच्छ, चॉकलेट्स आणि खेळणी भेट दिली व कोरोनातून मुक्त झाल्याबद्दल अभिनंदन केले.

'चिल्ड्रन्स होम सोसायटी'तील गतीमंद मुलांनी केली कोरोनावर मात

जुलै महिन्यात 'चिल्ड्रन्स होम सोसायटी' व्यवस्थापनाने मुंबई महानगरपालिकेशी संबंध साधून काही मुलांना खोकला असल्याची माहिती दिली होती. यानंतर मुंबई महानगरपालिकेच्यावतीने याठिकाणी फिव्हर कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पमध्ये एकूण 268 मुलांची स्क्रिनिंग करण्यात आली. त्यातील 84 मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यानंतर 25 कोरोनाबाधित मुलांना बिकेसीमधील कोविड सेंटरमध्ये हलवण्यात आले होते. वेळीच उपचार करण्यात आल्याने ही 25 मुले कोरोनामुक्त होऊन पुन्हा एकदा 'चिल्ड्रन्स होम सोसायटी'मध्ये दाखल झाली आहेत.

'चिल्ड्रन्स होम सोसायटी'मधील गतिमंद मुलांना कोरोनाची लागण झाल्याची बाब अत्यंत गंभीर होती. मुंबई पालिका प्रशासनाने वेळीच योग्य ती खबरदारी घेऊन केलेल्या स्क्रिनिंगमुळे प्राथमिक अवस्थेतच या संक्रमणाची माहिती मिळू शकली, असे खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटले. आमदार शेवाळे यांनी कोविड सेंटरचे अधिष्ठाता डॉ. ढेरे आणि त्यांच्या टीमचे आभार मानले. यावेळी विभागप्रमुख मंगेश सातमकर, बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर, महिला विभाग संघटिक रिटा वाघ, विधानसभा संघटक निमिष भोसले, पदाधिकारी राजेंद्र पोळ, अरुण हुले आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.