मुंबई: मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड अप आणि डाउन धिम्या मार्गावर, हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर तर ट्रान्स हार्बर मार्गावर पनवेल आणि ठाणे दरम्यान मेगा ब्लॉक असल्याने प्रवाशांनी त्याची दखल घेवून आपला प्रवास करावा असे, आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक : मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड अप आणि डाउन धिम्या मार्गावर सकाळी ११.०० ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.१८ या वेळेत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. मुलुंड नंतर पुन्हा धिम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. सकाळी १०.५८ ते दुपारी ३.५९ या वेळेत ठाणे येथून अप धिम्या मार्गावरील लोकल मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, शीव स्थानकावर थांबतील. पुढे अप धीम्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील. नेहमीपेक्षा या लोकल १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.
हार्बर मार्गावर मेगाब्लॉक: पनवेल ते वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत बेलापूर नेरुळ खारकोपर मार्ग वगळून मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. यावेळी पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील ट्रेन तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेल बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील ट्रेन बंद राहतील.
ट्रान्सहार्बर मार्गावर मेगा ब्लॉक: ट्रान्सहार्बर मार्गावर पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणारी आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत पनवेल करीता जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई पासून वाशी पर्यंत विशेष लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे ते वाशी, नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असतील. ब्लॉक कालावधीत बेलापूर खारकोपर आणि नेरुळ खारकोपर दरम्यान लोकल ट्रेन वेळापत्रकानुसार धावतील अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा : Local Megablock Mumbai मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक