मुंबई - विविध अभियांत्रिकी व देखभालीच्या कामांसाठी मध्य रेल्वेतर्फे उपनगरीय भागांवर उद्या मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मुख्य मार्गावर (मेन लाइन) विद्याविहार ते ठाणे अप व डाउन जलद मार्गावर सकाळी 10.30 ते दुपारी 3.30 पर्यंत मेगाब्लॉक असेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.45 ते दुपारी 2.30 दरम्यान सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील विशेष सेवा माटुंगा ते दिवा दरम्यान डाउन धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. या विशेष सेवा आपल्या निर्धारित थांब्यांवर थांबतील आणि दिवा येथे पुन्हा डाउन जलद मार्गावर वळविण्यात येतील तर दिवा येथून सकाळी 9.58 ते दुपारी 3.18 पर्यंत सुटणाऱ्या अप जलद विशेष सेवा दिवा आणि माटुंगा दरम्यान अप धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. या सेवा आपल्या निर्धारित थांब्यांवर थांबविण्यात येतील आणि पुन्हा माटुंगा येथे अप जलद मार्गावर वळविण्यात येतील.
शासकीय कर्मचाऱ्यांसाठी तिजोरीत खडखडाट; मंत्र्यांच्या गाड्यांसाठी उधळपट्टी
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.25 ते संध्याकाळी 4.25 पर्यंत,चुनाभट्टी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 पर्यंत मेगाब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 11.15 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत पनवेलला जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील विशेष सेवा बंद राहतील. सकाळी 9.45 ते दुपारी 2.41 या वेळेत पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील विशेष सेवा बंद राहतील. तथापि, ब्लॉक कालावधीत विशेष लोकल गाड्या पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक.8) धावतील. ब्लॉक कालावधी दरम्यान हार्बर मार्गावरील प्रवाशांना मेन लाइन मार्गे प्रवास करण्याची परवानगी आहे.