मुंबई Mumbai Local Mega Block : अभियांत्रिकी देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी उद्या (12 नोव्हेंबर) मध्य रेल्वेच्या प्रशासनाकडून मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी हे नियोजन पाहूनच प्रवास करावा. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मध्य रेल्वेच्या विद्याविहार या उपनगरीय रेल्वे स्थानकापर्यंत मोठ्या स्वरुपात मेगाब्लॉक असणार आहे. दरम्यान, सकाळी 10 वाजून 55 मिनिटापासून ते दुपारी 3 वाजून 55 मिनिटापर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे.
असं असेल वेळापत्रक : मेगा ब्लॉकच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून विद्याविहारकडं जाताना सर्व लोकल रेल्वे या फास्ट मार्गावरुन चालवल्या जाणार आहेत. तसंच भायखळा, परळ, दादर त्याशिवाय माटुंगा आणि सायन तसंच कुर्ला रेल्वेस्थानक या ठिकाणी जलद मार्गावर लोकल ट्रेन वळवल्या जातील. जलद फलाटावर ट्रेन थांबतील. तर घाटकोपरपासून सकाळी 10 वाजून 41 मिनिट ते दुपारी तीन वाजून 52 मिनिटापर्यंत तर घाटकोपर ते छत्रपती शिवाजी टर्मिनस जाणाऱ्या सर्व लोकल ट्रेन विद्याविहारपासून सीएसटीपर्यंत विविध रेल्वे स्थानकांवर वळवल्या जातील. कुर्ला, सायन, दादर, माटुंगा. परळ, भायखळा अशा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान जलद मार्गावरुन वळवल्या जाणार आहेत.
हार्बर मार्गावर मेगाब्लॉक : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून ते चुनाभट्टी आणि वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11 वाजून 40 मिनिटापासून ते सायंकाळी 4 वाजून 40 मिनिटापर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर चुनाभट्टी ते वांद्रेपर्यंत सकाळी 11 वाजून 10 मिनिटे तर सायंकाळी 4 वाजून 10 मिनिटापर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरील सकाळी 11 वाजतापासून तर सायंकाळी 04:47 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी तसेच वडाळा, बेलापूर आणि पनवेलसाठी रवाना होणाऱ्या डाउन लोकल ट्रेन रद्द केल्या जाणार आहेत.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून हार्बर मार्गावरुन गोरेगाव या पश्चिम रेल्वेच्या स्थानकापर्यंत जाणाऱ्या लोकल ट्रेन सकाळी 10 वाजून 48 तर दुपारी 4 वाजून 43 मिनिटापर्यंत रद्द केलेल्या आहेत. तर पनवेल, बेलापूर, वाशीपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडं जाणाऱ्या लोकल ट्रेनचा मेगाब्लॉक सकाळी 9 वाजून 53 मिनिटे ते दुपारी 3 वाजून 20 मिनिटापर्यंत असणार आहे. गोरेगाव वांद्रे अप दिशेनं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडं जाताना सकाळी 10:45 ते दुपारी 5 वाजून 13 मिनिटापर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.
हेही वाचा -
Megablock : 29 ऑक्टोबरला मुंबईकरांना 'मेगाब्लॉक'चा फटका; जाणून घ्या वेळापत्रक
Mumbai Railway Megablock : मुंबईकरांनो लोकलनं प्रवास करताय? जाणून घ्या, मेगाब्लॉकचं वेळापत्रक