मुंबई : सर्वोच्च न्यायालयात सत्ता संघर्षाची लढाई सुरू आहे. शिंदे फडणवीस सरकार असंविधानिक रित्या सत्तेवर आल असल्याचा उल्लेख सातत्याने महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. राज्यात महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरात लवकर घोषित व्हाव्यात. या निवडणुकांमधून जनता राज्य सरकारला तसेच केंद्र सरकारला अद्दल घडवेल असा इशाराही महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून देण्यात येत आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सभा आयोजित : आता अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते थेट जनतेत जाऊ पुन्हा एकदा शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात राण उठवणार आहेत. यासाठी महाविकास आघाडीने राज्यातील प्रमुख सात जिल्ह्यांमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सभा आयोजित केले आहेत. या सभांच्या नियोजनासाठी 15 मार्च रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे महाविकास आघाडीच्या तिन्ही नेत्यांची बैठक पार पडणार असून, होणाऱ्या सात सभांबाबत आयोजन आखले जाणार आहे.
पहिली सभा 2 एप्रिलला : महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या होणाऱ्या या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे, अजित पवार बाळासाहेब थोरात, नाना पटोले, अशोक चव्हाण यासारख्या नेत्यांचा समावेश असणार आहे. याची पहिली सभा 2 एप्रिलला संभाजी नगर येथे होणार आहे. या सभेची जबाबदारी विधान परिषद विरोधी पक्ष नेते, ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्याकडे देण्यात आली आहे. तर, 16 एप्रिलला दुसरी सभा नागपूरला नागपुरात पार पडणार असून नागपूरमध्ये होणाऱ्या सभेची जबाबदारी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री सुनील केदार यांना देण्यात आली आहे.
११ जूनला सातवी सभा : मुंबईतील बीकेसी मैदानावर 1 मे तिसरी सभा होईल. या सभेची पूर्ण जबाबदारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर असणार आहे. पुण्यात महाविकास आघाडीची चौथी सभा होणार असून या सभेचे सर्व नियोजन अजित पवार करणार आहेत. तर, तेथेच 28 'मे' ला पाचवी सभा कोल्हापूरला पार पडेल या पाचवा सभेसाठी काँग्रेसचे नेते सतेज पाटील या सभेचे सर्व आयोजन करणार आहेत. 3 जुनला नाशीकमध्ये सहावी सभा होईल. या सभेची संपूर्ण जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. महाविकास आघाडीची शेवटची, सातवी सभा ११ जूनला आमरावती सातवी सभा होणार असून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या यशोमती ठाकूर हे या सभेचे आयोजन करणार आहेत.
तयारीची बैठक 15 मार्चला : 15 मार्चला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे महाविकास आघाडीच्या सर्व मुख्य नेत्यांची आणि तीनही पक्षांच्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत होणाऱ्या सातही सर्वांच्या आयोजनाबाबत अंतिम चर्चा होणार आहे. पहिली सभा ही छत्रपती संभाजी नगर येथेच होणार असल्याची माहिती विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे. या सभांच्या माध्यमातून शिंदे, फडणवीस सरकारच्या विरोधात महाविकास आघाडी जनतेमध्ये जाणार असून, शिंदे फडणीस सरकार कशाप्रकारे असविधानिक पद्धतीने सत्तेवर बसला आहे.
केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर : केंद्रीय तपास यंत्रणेचा राज्य सरकार वाचवण्यासाठी कशाप्रकारे दुरुपयोग केला जातो. केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून शिवसेना पक्ष कशाप्रकारे बेकायदेशीर रित्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून देण्यात आला. या महत्त्वाच्या मुद्द्यांवर महाविकास आघाडीचे नेते हात घालणार आहेत. राज्यात, देशात लोकशाही टिकवण्याच्या उद्देशाने या महाविकास आघाडीच्या सभा सुरू असल्याचे जनतेला पटवून देण्याचे काम या सभेच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे नेते करणार आहेत.
हेही वाचा - Digital India : डिजिटल इंडिया फक्त नावापुरतेच; तीन वर्षांत ग्रामपंचायतींच्या संगणकीकरणावर शून्य तरतूद