ETV Bharat / state

आरोग्य विभागातील 'अ' व 'ब' संवर्गातील पदभरतीबाबत लवकरच बैठक; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती - महाराष्ट्र आरोग्य विभाग पदभरती न्यूज

कोरोना महामारीच्या काळात राज्यातील आरोग्य विभागाने मोठी कामगिरी केली. मात्र, पुरेसे मनुष्यबळ नसल्याने काम करता करता विभागाची दमछाक झाली. आता राज्यातील रिक्त पदे भरली जाणार आहेत. त्याबाबत कार्यवाही सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

Rajesh Tope
राजेश टोपे
author img

By

Published : Mar 9, 2021, 7:52 AM IST

मुंबई - आरोग्य विभागातील 'ड' संवर्गाची पदे महिनाभरात भरली जातील. 'क' संवर्गातील ५० टक्के पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे व उर्वरित ५० टक्के पदांबाबत आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतर ही पदे भरली जातील. 'अ' व 'ब' संवर्गाच्या बाबतीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती नियमात बदल होत आहेत. या पार्श्वभूमीवर येत्या महिन्याभरात मुख्य सचिवांकडे आरोग्य, सामान्य प्रशासन, विधी व न्याय अशा सर्व संबंधित विभागांची एकत्रित बैठक घेऊन प्रश्न सोडवला जाईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विधानपरिषदेत दिली.

जीव धोक्यात घालणारे वाऱ्यावर -

राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागातील सर्व संवर्गातील पदे भरण्याबाबत सदस्य विक्रम काळे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न विचारला होता. कोविड काळात राज्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी कंत्राटी पध्दतीने डॉक्टर-कर्मचारी वर्ग घेण्यात आला. मात्र, कोरोना कमी झाल्यानंतर कोविड सेंटर बंद करून तेथील कर्मचारी कमी करण्यास सुरुवात झाली. शिवाय वेतनही दिले जात नाही, अशी वस्तुस्थिती आहे. आपत्कालीन स्थितीत जीव धोक्यात घालणाऱ्यांवर हा अन्याय आहे. सरकारने याबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी सूचना काळे यांनी केली होती. परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सदस्य विनायक मेटे, भाई जगताप, महादेव जानकर, निरंजन डावखरे आदींनी राज्यातील आरोग्य व्यवस्थेतील अडचणींचा पाढा वाचला.

भरती घोटाळ्याबाबत कारवाई करणार -

सार्वजनिक आरोग्य विभागात राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कोविड काळात २६ हजार ४६८ पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात आली आहेत. विभागात ५४ केडर आहेत. त्यापैकी २-३ केडरच्या अनुषंगाने काही प्रश्न निर्माण झाले. त्याबाबत चौकशी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल. विशेषज्ञ डॉक्टरांची पदे भरण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला जाईल. कोविड काळात काम करणाऱ्या ज्या कंत्राटी डॉक्टरांचे वेतन प्रलंबित आहे, त्यांचे वेतन तातडीने देण्यात येईल. ज्या कंत्राटदारांनी डॉक्टरांना वेतन दिले नसेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली

राज्यातील सर्व रुग्णालयांच्या ‘फायर ऑडिट’ची कार्यवाही सुरू -

भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीनंतर राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विधानपरिषदेत सांगितले. भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत बालकांच्या झालेल्या मृत्यूबाबत सदस्य गिरीशचंद्र व्यास यांनी प्रश्न उपस्थित केला होता. याला उत्तर देताना टोपे बोलत होते. मृत पावलेल्या बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी नऊ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. नवीन बांधकाम होणाऱ्या रुग्णालयाचे फायर एनओसी व इतर आवश्यक त्या एनओसी असल्याशिवाय हस्तांतरित होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट, स्ट्रक्चरल ऑडिट, इलेक्ट्रीक ऑडिट, मॅाक ड्रील, फायर एनओसी प्राप्त करून घेण्याची कार्यवाही सुरू असल्याचे टोपे यांनी सांगितले.

भंडारा येथील आगीच्या दुर्घटनेप्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली होती. या चौकशी समितीच्या अहवालानंतर जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधिकारी यांना निलंबित करण्यात आले आहे. कंत्राटी तत्वावर असलेले बालरोग तज्ज्ञ व 2 स्टाफ नर्स यांच्या सेवा समाप्त करण्यात आल्या आहेत. तर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांची बदली करण्यात आली असल्याचे टोपे यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी देखील भाग घेतला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.